
वसंत साबळेंना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक; राज्यपालांच्या हस्ते सन्मान
कऱ्हाड : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवृत्त पोलीस अधिकारी वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक देवुन सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना हे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.
सातारा पोलिस दलात वसंत साबळे यांनी १९८४ पासून में २०२० पर्यंत ३६ वर्षे सेवा केली. त्यादरम्यान त्यांनी खंडाळा, मेढा , फलटण, कऱ्हाड, सातारा आणि कोरेगांव पोलीस ठाण्यात काम केले. त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत अनेक दरोडे, जबरी चोरी, खंडणी, महिला अत्याचार, पोक्सो, पिटा, एमपीआयजी, मोक्का वगैरे अनेक कायद्यान्वये कार्यवाही केली होती. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांना ५५० पेक्षा जादा रिवॉर्ड देवून सुमारे अडीच लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक मिरा बोरवणकर, सुरेश खोपडे, चंद्रकांत कुंभार, प्रशांत बुरडे, संदीप पाटील, तेजस्वी सातपुते आणि विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी गौरवले आहे.
हेही वाचा: ग्रामीण मुलांना आता ऑक्सफर्डचा अभ्यासक्रम भारतातून करणे शक्य
त्यांच्या उत्कृष्ट गुन्हे तपासाबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही यापुर्वी त्यांचा गौरव केला आहे. त्यांना यापुर्वी पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक, दोन जादा वेतनवाढ व तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती मेडल प्रदान केलेले आहे. वसंत साबळे हे चांगले खेळाडूही असुन त्यांनी अनेक ठिकाणी त्याची बक्षिसे पटकावली आहेत. त्यांनी पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते.
त्याचे वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. दोनवेळा राष्ट्रपती पारितोषिकाने गौरवण्यात आलेले ते जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले आहेत. त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस उपाधिक्षक किद्रे, डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद सदस्या वनिता गोरे, किरण साबळे, सरपंच किशोर शिंदे, आबाकोंडी साबळे, मुख्याध्यापक श्री मदने, वडुथ ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Web Title: Vasant Sabale President Medal Governor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..