esakal | पुणे- बंगळूर महामार्गावर वाशी- गोवा बसला अपघात; पाच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे- बंगळूर महामार्गावर वाशी- गोवा बसला अपघात; पाच ठार

घटनास्थळी स्थानिक नागरिक व युवकांनी तसेच उंब्रज पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले होते. जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावर वाशी- गोवा बसला अपघात; पाच ठार

sakal_logo
By
संताेष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. क-हाड) गावच्या हद्दीत वाशी ते गोवा जाणारी खासगी मिनी बस एम. एच. ०१ सी आर ९५६५ ही तारळी पूलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट तारळी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

आज (शनिवार) पहाटे साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील मृतांमध्ये एक महिला व तीन वर्षांच्या बालकासह अन्य तीन पुरुषांचा समावेश आहे. मधुसुदन गोविंद नायर (४२), उषा मधुसुदन नायर (४०) अदित्य मधुसुदन नायर (२३) सर्व (वाशी नवी मुंबई), साजन एस. नायर (३५), आरव साजन नायर (वय तीन दोघे रा. कोपरखैरणै, वाशी) अशी जागीच मयत झालेल्यांची नावे आहेत.

प्रवास होणार सुखकर! मल्हारपेठ-पंढरपूरसह मायणी रोड टकाटक, त्रासलेल्या नागरिकांना दिलासा 

घटनास्थळी स्थानिक नागरिक व युवकांनी तसेच उंब्रज पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले होते. जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image