प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्ल्याने चिमुरड्याला बाधा

Anganwadi School
Anganwadi Schoolesakal
Summary

अंगणवाडीत फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यास बाधा झाली आहे.

कुडाळ (सातारा) : कुडाळ (ता. जावळी) येथील अंगणवाडीमध्ये (Anganwadi School) फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यास बाधा झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. येथील सूज्ञ ग्रामस्थांनी अंगणवाडीतील फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ (Fiber Plastic Blended Rice) पुरवठा करण्‍यात आल्‍याच्‍या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत पालक व ग्रामस्थांनी स्टिंग ऑपरेशन करून एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेअंतर्गत (Integrated Child Development Project Plan) अंगणवाडीत मुले व गरोदर माता महिलांना पुरवल्या जाणाऱ्या निकृष्‍ट अन्नधान्य पुरवठा काळाबाजार उघडकीस आणलाय. दरम्यान, संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. कुडाळ अंगणवाडीस पुरवल्या गेलेल्या अन्नधान्य पुरवठामध्ये निकृष्ट दर्जाचे फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ व डाळ, मीठ, मिरची पूड त्याचबरोबर इतर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्‍याचे ग्रामस्थांना निदर्शनास आले. दोन दिवसांपूर्वीच पुरवठा झालेल्या इंदिरानगर येथील एका कुटुंबातील मुलाने तांदूळ व डाळ खाल्ल्याने त्याला बाधा झाली.

Anganwadi School
केंद्र सरकारमुळे राज्यातील कारखाने अडचणीत

याबाबत संबंधित अंगणवाडी सेविका व पुरवठा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा प्रकार अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत सदस्य वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला. संपूर्ण पुरवठा झालेला धान्य वस्तू तपासल्यानंतर त्यातील बऱ्याच वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आले. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभाग व ठेकेदार करत असल्याचा आरोप ग्रामस्‍थांकडून होत आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी कठोर पावले उचलत संबंधित पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com