लोकनियुक्त सरपंचांवर कासार शिरंबेत अविश्वास ठराव मंजूर

लोकनियुक्त सरपंचांवर कासार शिरंबेत अविश्वास ठराव मंजूर

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) ः कासार शिरंबे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच यशोदा माने यांच्यावरील अविश्वास ठरावावर ग्रामसभेच्या मतदानाने शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी घेतलेल्या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने 966, तर विरोधात 603 मते पडली. त्यामुळे त्यांचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. 

कासार शिरंबे येथील जयवंतराव पाटील, जयवंतराव बोंद्रे, जयशंकर यादव, संतोष पाटील यांनी एकत्र येऊन कालिका बहुजन रयत पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांच्या गटाचे सरपंचासह दहा सदस्य निवडून आले. दरम्यान, सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत अविश्वास ठराव आणण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली होती.

शहागंजच्या घड्याळाची पुन्हा टिकटिक! दोन आठवड्यांत कामाला सुरुवात 

त्यानंतर त्यासंदर्भात निर्णय होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाच्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अविश्वास ठरावाबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार तहसीलदार वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये 11 ते दुपारी चार दरम्यान मतदानही घेण्यात आले. त्यानुसार अविश्वास ठरावाच्या बाजूने 966, तर विरोधात 603 मते पडली, तर 38 मते बाद झाली. त्यामुळे सरपंच माने यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचेही तहसीलदार वाकडे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची 'इस्त्रो'त चमक 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com