esakal | बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर

या घटनेनंतर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल ग्रामस्थांवर कारवाई करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत. आजही बगाडावरील मानकरी व बगाड्या अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : बावधन बगाड यात्रा प्रकरणी आणखी 13 लोकांना अटक केली. दरम्यान पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी वाई पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
 
बगाडाची मिरवणूक काढून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बावधन (ता. वाई) येथील अडीच ते तीन हजार लोकांवर वाई पोलिस ठाण्यात तहसीलदार रणजित भोसले यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 110 लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील 83 लोकांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 2) अटक केली. त्यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. 

या गुन्ह्यात पुन्हा 13 लोकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, गावाला आजही पोलिस छावणीचे स्वरूप होते. बगाड यात्रेनंतर पुढील कोणतेही धार्मिक विधी करू नयेत, म्हणून प्रशासनाने बावधन येथे रात्री ग्रामस्थांची बैठक आयोजिली होती. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जाणवे- खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांना याबाबत सूचना केल्या. 

बागडाच्या आदल्यादिवशी गुरुवारी (ता. 1) रात्री छबिन्याच्या निमित्ताने ग्रामस्थांनी भैरवनाथ देवाची पालखी मिरवणूक काढली होती. मिरवणूक काढल्याबद्दल दहा ग्रामस्थ व इतर अनोळखी 25 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघजाईवाडी येथेही पालखी मिरवणूक काढल्याबद्दल चार ग्रामस्थ व इतर अनोळखी 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप होते. या घटनेनंतर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल ग्रामस्थांवर कारवाई करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत. आजही बगाडावरील मानकरी व बगाड्या अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

अंगापूर वंदनची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द; साताऱ्यात जमावबंदी लागू

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या; आमदार शिंदेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

रिलायन्सने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले; टोल दरवाढीविरोधात खासदार उदयनराजे आक्रमक

खुर्चीखाली नारळ ठेऊन चांगला कारभार करता येत नाही; अतुल भोसलेंचा विरोधकांवर घणाघात

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top