उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाचा निर्वाळा

सिद्धार्थ लाटकर/भद्रेश भाटे
Friday, 22 January 2021

यावेळी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, नगरसेवक दत्ता बनकर, माजी नगरसेवक राजू गाेडसे, विकास शिंदे उपस्थित हाेते.

वाई (जि. सातारा) : आनेवाडी (ता वाई) टोल नाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व त्यांच्या 11 समर्थकांची वाई न्यायालयाने आज (शुक्रवार) निर्दोष मुक्तता केली. पाच ऑक्टोबर २०१७ ला संध्याकाळी सहा वाजता आनेवाडी टोल नाका येथे खासदार उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले , सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. 

आनेवाडी टोल नाका येथे 250 जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा व टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे बोलून टोल हस्तांतरणास विरोध केला होता. यावेळी टोल नाक्यावर टोलनाका वसुली व हस्तांतर यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे टोल नाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. यावेळी तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. याबाबत भुईज पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार धनाजी तानाजी कदम यांनी फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या. एम. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. 

अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या 11 सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी आज (शुक्रवार) न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकार पक्षाच्या वतीने रमेश पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने ऍड ताहेर मणेर यांनी काम पाहिले.
 

कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन? 

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wai Court Acquitted MP Udayanraje Bhosale Anewadi Toll Naka Satara Breaking News