वाशी, रत्नागिरी, वाईतील मुलींची साेशल मिडीयावर बदनामी करणा-यास पुण्यात अटक

भद्रेश भाटे
Friday, 25 December 2020

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीमती शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलिस नाईक प्रशांत शिंदे, हवालदार सोमनाथ वल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी ही कारवाई केली.

वाई (जि. सातारा) : बनावट फेसबुक अकाउंटद्वारे महिला व मुलींशी ओळख करून त्यांच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्‍लील फोटो फेसबुक व समाजमाध्यमांवर सोडून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. याप्रकरणी जानेवारी 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांकडून गुन्ह्यातील संशयिताचा शोध सुरू होता. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सिंहगड रस्ता, पुणे येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. 

प्रवीण रेमजे असे त्याचे नाव आहे. त्यास वाई न्यायालयाने 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताने 25 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान वाईतील एका मुलीस बनावट फेसबुक खात्यावरून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ओळख काढली. या वेळी त्याने मुलीचा व्हॉटसऍप मोबाईल नंबर घेतला. यानंतर तिच्या फेसबुकवरील फोटोचा गैरवापर करून अश्‍लील फोटो तयार केले. ते फोटो मुलीला पाठविले, तसेच बनावट फेसबुक खात्यावर पाठविले. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तांत्रिक पद्धतीने व बातमीदारामार्फत तपास केला. संशयिताने बीड येथील दुसऱ्याच्या नावावर असलेले सीमकार्डचा वापर करून बनावट फेसबुक खाते उघडून वाशी, रत्नागिरी, वाई येथील मुली व महिलांची अशा पद्धतीने बदनामी होईल, असे कृत्य केल्याचे व त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

कोल्हापूरच्या दोघांनी वाईतील जुळ्या भावांना गंडविले; कऱ्हाडात गुन्हा दाखल 

पुणे येथे हॉटेलमध्ये वेटरकाम करताना सहकाऱ्यांचे सिमकार्ड चोरून संशयिताने हे गैरकृत्य केले. संशयिताचे सर्व मोबाईल बंद लागत होते. त्याच्या सध्याच्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे संशयित मिळून येत नव्हता. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तांत्रिक माहिती मिळवत कसोशीने तपास केला. त्याला पुणे येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीमती शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खोबरे यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलिस नाईक प्रशांत शिंदे, हवालदार सोमनाथ वल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी केली.

"सरकारे आएंगी, जाएंगी... ये देश रहना चाहिए; हळव्या मनाचे कणखर वाजपेयी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wai Police Arrested Youth From Pune For Defamation Of Women On Social Media Satara News