Video : काेयना धरणातून दहा हजारांवर क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

विजय लाड/ सिद्धार्थ लाटकर | Saturday, 15 August 2020

कोयना धरणात आज (शनिवार) 80.76 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 80.66 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 136 नवजा येथे 82 व महाबळेश्वर येथे 156 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

सातारा - काेयनानगर : सातारा जिल्ह्यात आज (शनिवार) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील कोयना धरणातून सकाळी 11 वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामध्ये सहा वक्र दरवाजे एक फुट नऊ इंच उचलण्यात आले आहेत. सांडव्या वरुन 9360 क्‍यूसेक व धरण पायथा विजगृहमधून 1050 क्‍यूसेक असा एकूण 10410 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन समितीचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?
 
दरम्यान सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी 31.56 मिली मीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 40.60 (641.27), जावली - 69.33 (1074.89), पाटण - 46.55 (984.18), कराड - 22.62 (451.69), कोरेगाव - 22.56 (415.38), खटाव - 9.96 (350.02), माण - 5.14(296.71) , फलटण - 2.89 (283.51), खंडाळा 10.20 (350.90), वाई -25.57, महाबळेश्वर - 147.10 (3584.28) याप्रमाणे आज एकूण 402.51 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 

शिवेंद्रसिंहराजे... पक्षांच्या नेत्यांपुढे गोंडा घोळणे बंद करा 

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी 

कोयना धरणात आज (शनिवार) 80.76 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 80.66 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 136 नवजा येथे 82 व महाबळेश्वर येथे 156 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम - 8.39 (71.79, धोम-बलकवडी- 3.58 (90.39), कण्हेर - 8.45 (88.05), उरमोडी - 9.16 (94.87), तारळी- 4.85 (86.03), निरा-देवघर 7.80 (66.55), भाटघर-18.67 (79.43), वीर - 9.29 (98.81).

Edited By : Siddharth Latkar

पुतण्याच्या आत्महत्येप्रकरणी विडणीतील चुलत्यांना अटक