कऱ्हाडला ११ जानेवारीपासून 'एकवेळ'च पाणी पुरवठा : मुख्याधिकारी डाके | Water Supply | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

कऱ्हाडला ११ जानेवारीपासून 'एकवेळ'च पाणी पुरवठा : मुख्याधिकारी डाके

कऱ्हाड : पालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला दरवर्षी होणारा चार कोटी ५० लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी शहरात दररोज दोन वेळा पाणी पुरवठा बंद करून तो एकवेळ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याची अमंलबजावणी ११ जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.  

शहरात ११ जानेवारीपासून दररोज सकाळी एक तास पाणी पुरवठा होणार आहे. शहरात अनेक वर्षापासून सकाळी व सायंकाळी एसा दोनवेळा पाणी पुरवठा होत आहे. मात्र मुख्याधिकारी डाके यांनी तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी योजनेचा तोटा भरून काढण्यासाठी मोटा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी स्पष्ट केले. श्री. डाके म्हणाले, पालिकेतर्फे सकाळी व सायंकाळी शुद्ध पाणी पुरवठा होत आहे.

हेही वाचा: जपानमधून व्हिसीद्वारे शपथ : प्रतिज्ञापत्र न्यायालयाने धरले ग्राह्य

मात्र पाणी पुरवठ्याची योजना अनेक वर्षापासून वर्षे तोट्यात आहे. पाणी पुरवठ्यासाठी पालिकेला वार्षिक आठ कोटींचा खर्च आहे. खर्चाएवढी मिळकत नाही. पाणीपट्टीच्या माध्यमातून तीन कोटी ५० लाखांची ती वार्षिक वसुली होते. त्यामुले योजना चार कोटी चार ५० लाखांच्या तोट्यात आहे. तोट्याच्या तुलनेत पाणीपट्टीही वाढवलेली नाही. मागील वर्षी नाममात्र ६० रूपयांची वाढ झाली. तरीही तोटा भरून निघत नव्हता.

त्यामुळे अखेर एकवेळ पामी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. दोन वेळ पाणी पुरवठा करण्यासाठी नदीतून दोन वेळा उपसा करावा लागतो. त्या प्रक्रियेवर मोठा खर्च आहे. एकवेळ पाणी पुरवठा झाल्यास तो खर्चही आटोक्यात येईल. पाण्याचा वापरावरही नियंत्रण येईल. सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरही ताण कमी होवून तेथील पाणी शुद्धीकरणाचाही ताण कमी होणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी पाणीकर वाढवणे किंवा खर्च कमी करणे असे पर्याय होते.

हेही वाचा: कैद्याचा मृत्यू प्रकरण : कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा

त्यात नागरिकांवर पाणीपट्टी वाढीचा बोझा न टाकता एकवेळचा पाणी पुरवठ्याचा बंद निर्णय घेतला आहे. पालिकेने घेतलेल्या उपायामुळे वार्षिक दोन कोटी रूपयांचा तोटा भरणे काढणे शक्य होणार आहे. पाणी पुरवठा योजनेच्या दरवर्षी होणाऱ्या चार कोटी ५० लाखांच्या तोट्यापैकी दोन कोटींची बचत एकवेळचा पाणी पुरवठ्यामुळे होणार आहे. एकवेळ पाणी पुरवटा केल्यास तोटा चोर कोटी ५० लाखावरून केल्यास दोन कोटी ५० लाखांवर घटणार आहे. पर्यायने दोन कोटींची बचतही होणार आहे.

शहरात सकाळी, सायंकाळचा पाणी पुरवठा होत होता. मंगळवार व शनिवारचा सायंकाळी होणारा पाणी पुरवठा बंद होता. मात्सार आता दररोजचा सायंकाळी होणारा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी ११ जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satarawater
loading image
go to top