बघा... एका नागरिकाने प्रशासन आणले "ऍक्‍शन मोड'वर

बघा... एका नागरिकाने प्रशासन आणले "ऍक्‍शन मोड'वर

कोरेगाव (जि. सातारा) : सात दिवसांच्या स्वयंस्फूर्त बंदनंतर बाजारपेठ सुरू होताच दुकानांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नसल्याच्या एका नागरिकाच्या तक्रारीवरून प्रशासन "ऍक्‍शन मोड'मध्ये आले आणि तहसीलदारांच्या आदेशावरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ग्राहकांची गर्दी करणाऱ्या दुकानदारांसह मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून संबंधितांकडून सुमारे सहा हजारांचा दंड वसूल केला.
 
कोरेगाव शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण कोरेगाव शहर काही दिवसांसाठी बंद ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवावे लागेल, असे मुख्याधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर यासंदर्भातील निर्णय प्रलंबित राहिला होता. दरम्यान, व्यापारी संघटनेची मागणी व जनरेट्यामुळे स्वयंस्फूर्त बंद पाळण्यासंदर्भात नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची बैठक झाली आणि शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळून सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाला. बंद काळात औषधांची दुकाने आणि दूध डेअरी सुरू ठेवण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली. 

सरकार म्हणतं, एलआयसीचं खासगीकरण नाही; पण हे अर्धसत्यच!

त्यानुसार, गेल्या नऊ तारखेपासून (ता. 15 पर्यंत) अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण शहर बंद होते. सात दिवसांच्या स्वयंस्फूर्त बंदनंतर बाजारपेठ सुरू होताच दुकानांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नसल्याची तक्रार एका नागरिकाने तहसीलदारांकडे केली. त्यामुळे प्रशासन "ऍक्‍शन मोड'मध्ये आले आणि तहसीलदारांच्या आदेशावरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, उपाध्यक्षा संगीता बर्गे, काही नगरसेवक, तसेच पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, उपनिरीक्षक कदम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत बाजारपेठेत पाहणी केली.

विद्यालयाच्या मैदानावरील बड्डे पडला महागात; 20 युवकांवर गुन्हा दाखल

या वेळी ग्राहकांची गर्दी आढळून आलेल्या दुकानदारांसह मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून संबंधितांकडून सुमारे सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईसाठी मदत म्हणून तहसीलदारांनी त्यांचा एक प्रतिनिधीही पाठवला होता.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com