साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार; एकाला अटक

Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Summary

भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आलीय.

सातारा : परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक अत्याचार, तर इतर दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात आज उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीय. ही घटना सातारा तालुक्यातील (Satara Taluka) जैतापूर इथं दि. 23 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गावच्या पुलाजवळ निर्जन ठिकाणी घडलीय. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचं कळतंय.

या प्रकरणी नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशिर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. सातारा), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता. सातारा) यांची चौकशी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (Police Inspector Bhagwan Nimbalkar) यांनी दिली. सातारा शहरामध्ये भीक मागत असलेली 25 वर्षीय महिला 23 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी होती. यावेळी संशयित हे दोन दुचाकीवरून तिथं आले. ‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असं म्हणून दोघींना दुचाकीवर बसविलं. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, जैतापूर गावच्या (Jaitapur Village) हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली.

Satara Crime News
पतीने फसवलं; धर्म लपवलाच, मौलवीसह दिराने केला बलात्कार

पीडित महिलेला ओडत रस्त्याच्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेलं. इथं नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केला. तर, किरडेट पवार आणि भगत काळे यांनी त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केलंय. तसंच हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे ठार मारेन, अशी तिला धमकी दिली. यानंतर पीडित महिलेनं घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) जाऊन दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून घेत रविवारी रात्री चारही संशयितांना अटक केलीय. महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे या अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com