सोळशी घाटात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सोळशी घाटात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भुईंज (जि. सातारा) : सोळशी ते वेळेहून वाईला भरधाव जाणाऱ्या वाळूच्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. अमोल सुभान भोसले (वय 34 रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोळशी ते वाई रस्त्यावर वेळे गावच्या हद्दीत सोळशी घाटात साईबाबा वळणावर घाट चढत असलेल्या दुचाकीला वाळूच्या टिप्परने समोरून धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला त्याच अवस्थेत सोडून टिप्परसह चालकाने पलायन केले. वाळू अज्ञात ठिकाणी ओतून पुन्हा घटनास्थळी आणून उभा केला.

VIDEO : क्षेत्र महाबळेश्वरात काळा गहू; सातारा जिल्ह्यात प्रथमच कृषी विभागाचा प्रयत्न

दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी जखमीला वाई येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यृ झाला. या प्रकरणी टिप्पर चालक श्रीयश राजेंद्र परामणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कदम करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com