बंधा-यात सापडलेला मृतदेह पानवनच्या युवकाचा; तेरा दिवसांपासून हाेता बेपत्ता

बंधा-यात सापडलेला मृतदेह पानवनच्या युवकाचा; तेरा दिवसांपासून हाेता बेपत्ता

मायणी (जि.सातारा) : येथील चांद नदीपात्रात देशमुख वस्ती व शिंदेवाडी रोड दरम्यानच्या बंधाऱ्यात सोमवारी (ता.१६ ) एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मासे व अन्य जलचरांनी मृतदेहाचे लचके तोडल्यामुळे तो ओळखू येत नव्हता. पोलिस सर्वत्र तपास करत होते. ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत होते. त्याच वेळी माण तालुक्यातील पानवन येथील लहु लक्ष्मण तुपे हा वीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

त्याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृत देहाबाबत प्राथमिक माहिती व वर्णन संबंधितांना कळवले. पोलिसांनी केलेले वर्णन बेपत्ता लहू तुपे यांच्या वर्णनाशी जुळणारे असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तो मृतदेह लहू याचाच असल्याचे त्यांनी ओळखले.

दरम्यान, लहु तुपे हा तीन नोव्हेंबर पासून राहत्या घरातून कोणाला, काहीही न सांगता निघून गेला होता. कुटुंबीय व नातेवाईकांनी चार-पाच दिवस त्याचा शोध घेतला. मात्र कोठेही आढळून न आल्याने तो बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचे चुलते नाथा तुपे यांनी आठ नोव्हेंबर रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली होती.

आपल्यातलाच मुलगा आभाळाएवढा मोठा झाल्याने माथाडी कामगार भारावून गेले

साेमवारी सकाळी स्थानिक लोकांना बंधाऱ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर अजिंक्य दूध संघाचे चेअरमन हिंमतराव देशमुख यांनी त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर वडूजचे पोलिस निरीक्षक मालोजी देशमुख, उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. दरम्यान, बंधाऱ्यात मृतदेह सापडल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com