esakal | "काळ आला होता,पण वेळ आली नव्हती'; सुसाट गव्याने दुचाकीस्वारास उडविल्यानंतरही युवकाचा वाचला जीव

बोलून बातमी शोधा

"काळ आला होता,पण वेळ आली नव्हती'; सुसाट गव्याने दुचाकीस्वारास उडविल्यानंतरही युवकाचा वाचला जीव}

जखमी अवस्थेतच शैलेश पवार यांनी दुचाकी घेऊन तेथून घर गाठले. या हल्ल्यात त्यांच्या हातापायांना दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

satara
"काळ आला होता,पण वेळ आली नव्हती'; सुसाट गव्याने दुचाकीस्वारास उडविल्यानंतरही युवकाचा वाचला जीव
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : "काळ आला होता,पण वेळ आली नव्हती' याचे प्रत्यंतर देणारी घटना रविवारी (ता.24) रात्री सव्वादहाच्या सुमारास कसणी-घोटील रस्त्यावर घडली. कळपातून चुकल्याने बिथरलेल्या सुसाट गव्याने दूध संकलन करून घरी निघालेल्या युवकाच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे 15 फुटांवर उडविले. मात्र, प्रसंगावधान राखत गवा निघून जाईपर्यंत तो तेथेच निपचित पडून राहिल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. शैलेश मारुती पवार (वय 28) असे संबंधित युवकाचे नाव असून, त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. 

गव्यांकडून पिकांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना परिसरात यापूर्वीही घडलेल्या आहेत. कसणी-घोटील रस्त्यावरही रविवारी रात्री त्याची पुनरावृत्ती घडली. दूध संकलनाचा व्यवसाय करणारे घोटील येथील शैलेश पवार नेहमीप्रमाणे निवी-कसणी परिसरातून दूध संकलन केल्यानंतर आपल्या सहकाऱ्याला त्याच्या गावी सोडून दुचाकीवरून घोटीलकडे येत असताना शिवेचा माळ नावाच्या शिवाराजवळच्या रस्त्यावरील वळणावर अचानक समोरून धावत आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, शैलेश सुमारे 15 फुटांवर रस्त्याकडेला फेकले गेले.

चाकात पाय अडकल्याने तो सोडविण्यासाठी गव्याने काही अंतरापर्यंत दुचाकी तशीच फरफटत नेली आणि अडकलेला पाय निसटल्यानंतर तेथून शिवाराकडे धूम ठोकली. अगदी काही सेकंदात घडलेल्या या प्रसंगाने शैलेश घाबरून गेला होता. गवा निघून जाईपर्यंत ते तेथेच निपचित पडून राहिले आणि नंतर जखमी अवस्थेत दुचाकी घेऊन तेथून घर गाठले. या हल्ल्यात त्यांच्या हातापायांना दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

मी इथं बरा आहे शिवेंद्रसिंहराजे; बाळासाहेबांच्या विनंतीवर फलटणच्या राजेंनी केले ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन

आमचे खास बंधू.. म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर

दागिने चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

म्हसवडच्या उपाध्यक्षपदी धनाजी मानेंची बिनविरोध निवड