स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणा : मुख्य न्यायाधीश श्रीमती एन. एम. जमादार

स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणा : मुख्य न्यायाधीश श्रीमती एन. एम. जमादार

सातारा : जीवन सक्षमपणे जगण्यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. सुजाण नागरिक बनून देश आणि समाज बलशाली होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे मत मुख्य न्यायाधीश (बाल न्याय मंडळ, सातारा) श्रीमती एन. एम. जमादार यांनी व्यक्त केले. येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या निर्देशानुसार नुकताच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. 

त्या वेळी न्यायाधीश जामदार बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ""सध्याचे जग हे डिजिटल झाले आहे. युवकांच्या हातात विविध डिजिटल माध्यमे येत आहेत. काळानुसार त्याचा वापर केलाच पाहिजे; पण युवकांच्या सहनशीलतेवर त्याचा परिणाम होत आहे. आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटनामध्ये हे सहनशीलतेचे कारण दिसून येते. हे चिंताजनक आहे. युवकांनी या गोष्टींपासून सजग असले पाहिजे.'' स्वामी विवेकानंदांनी आदर्श युवक कसा असावा, याबाबत सुंदर विचार मांडले आहेत.

जीवन प्रवास सक्षमपणे करण्यासाठी विवेकानंदांचे विचार, राजमाता जिजाऊंची शिकवण आपण आचरणात आणली पाहिजे. विवेकानंदांच्या नजरेतील तरुण बनून स्वतःला युवकांनी सामर्थ्यशाली बनवावे, असेही त्यांनी सांगितले. ऍड. संतोष भोसले, प्रा. डॉ. व्ही. बी. सावंत यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांचे सहकार्य लाभले. प्रा. आसावरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य अरुण बावळेकर यांनी प्रास्ताविक केले. लघुलेखक दिलीप भोसले यांनी आभार मानले. 

Budget 2021 : स्टार्टअपला चालना देण्यासाठी निर्मला सीतारामण यांच्याकडून महत्त्वाचं पाऊल, केली मोठी घोषणा

मानलं! पालकमंत्री असावा तर असा; गाड्यांचा ताफा थांबवत बाळासाहेबांची अपघातग्रस्त दाम्पत्याला मदत

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com