कऱ्हाड : मोकळ्या जागांवरील करवसुली वादाच्या भोवऱ्यात

जुन्या-नव्या प्लॉटवरही कर आकारणीची गरज
Satara Municipality
Satara Municipality sakal

कऱ्हाड : जनरल फंडात ठणठणात असल्याने पालिकेने उत्पन्नाचे मार्ग शोधताना शहरातील मोकळ्या जागा, लेआउट करून ठेवलेल्या प्लॉटवर कर आकारणी करण्याचा पालिकेचा अजेंडा कागदावरच राहिल्याचे दिसते. त्या आधारावर पालिकेच्या उत्पन्नात तब्बल चार कोटींची भर पडणार होती. मात्र, निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने कर आकारणीच आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती आहे. शहरातील मोकळ्या जागांचा सर्व्हे अपूर्णच आहे. पालिकेच्या मासिक बैठकीत तो विषय मंजूर होऊनही त्या ठरावाची काहीच अंमलबजावणी झालेली नाही.

पालिकेच्या जनरल फंडात केवळ काही रक्कमच शिल्लक असून देणी मात्र कोटींत आहेत. पालिकेकडे पैसेच नसल्याने वीज बिलही थकीत होते. त्याचे कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली आहे. आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने पालिकेची कामे घेण्यासाठी ठेकेदारही नकारघंटा देत आहेत. आर्थिक टंचाईला जबाबदार घटकांवर काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्याउलट आर्थिक संकटावर मात करण्यासाठी जनरल फंडावर काम न टाकण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्याबाबत गटनेत्यांत एकमत झाले होते. त्यावर अंमलबजावणी झालीही; मात्र अपेक्षित परिणाम साधता आला नाही.

त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पालिका मार्ग शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने मोकळ्या जागांवर कर आकारणीचा निर्णय घेतला होता, प्रशासकीय पातळीवर कर आकारणीचा निर्णय झाला. त्याला मासिक बैठकीत मंजुरी मिळाली होती. मात्र, ती कर आकारणी आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने पालिकेचा सर्व्हेही अपूर्णच आहे.

...येथील मोकळ्या

  • जागांचा सर्व्हे अपेक्षित

  • वाखाण भाग

  • रुक्मिणीनगसहित रुक्‍मिणी पार्क

  • शिवाजी हाउसिंग सोसायटी

  • वाखाणसहित छत्रपती शिवाजी स्टेडियमची मागील बाजू

  • कार्वे नाका परिसरातील कॉलन्या

  • हद्दवाढ भागातील विविध कॉलन्यांतील मोकळ्या जागा

  • गोळेश्वर रस्त्यालगतच्या कॉलन्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com