esakal | 'हा' तुमचा पासवर्ड आहे का? सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

Password, PIN, keep confidential!

'हा' तुमचा पासवर्ड आहे का? सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड

sakal_logo
By
नामदेव कुंभार

दशकभरापासून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते. सध्याच्या डिजिटल (digital) युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो... पासवर्डमुळे (passwords) यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. त्यासाठी अनेक पोर्टल यूझर्सना अधिक सुरक्षित पासवर्ड ठेवण्याचं सुचवतात. पण अनेकजण लक्षात राहावं म्हणून सोपे पासवर्ड ठेवतात. पासवर्ड (passwords) संबधित एका संशोधनातून अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. या संशोधनातून मागील 12 महिन्यात जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत. (10 most used and common passwords list hackers also keep eye change it)

युझर्सना अनेक अकाऊंटचे पासवर्ड लक्षात ठेवणं केव्हा केव्हा फारच कठीण होतं. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेकजण विविध अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स (hackers) सहजरित्या क्रॅक करु शकतात. यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (NCSC) नुकतीच एक आकडेवारी जारी केली. जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड '123456' असून तो सहजरित्या हॅक केला जाऊ शकतो, असं समोर आलं आहे.

हेही वाचा: सर...माझा GMail चा पासवर्ड विसरला! आता मी काय करू? थेट गुगलच्या सीईओंना मागितली मदत

पासवर्ड आणि सायबर सिक्योरिटीबाबात यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे (NCSC) टेक्निकल डायरेक्टर डॉ. लैन लेवी यांच्यामते एकच पासवर्ड वारंवार वापरणेही धोकादायक आहे. डॉ. लैन लेवी यांच्यामते, एकच पासवर्ड विविध खात्याला आणि वारंवार वापरल्यास तो हॅक लवकर होऊ शकतो. पहिलं नाव, आवडीच्या खेळाडूचं नाव, जन्मतारीख यासारखे पासवर्ड ठेवू नका. हॅकर्स हे पासवर्ड कोणत्याही अडचणीशिवाय हॅक करु शकतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन यांसारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात.

हेही वाचा: पेन ड्राइव्हलाही ठेवता येतो पासवर्ड; माहित आहे कसा?

12 महिन्यात सर्वाधिक वापरलेले पासवर्ड -

  • 123456

  • 123456789

  • qwerty

  • password

  • 111111

  • 12345678

  • abc123

  • 1234567

  • password1

  • 12345