Space Station : डोळ्यांनी दिसणार महाकाय अंतराळकेंद्र; १६ देशांचा एकत्र प्रकल्प

खगोलप्रेमींना आजपासून पाहता येणार; ११ मे ते मंगळवार १६ मे या सहा दिवसांच्या काळात पहाटे व रात्री या स्पेस स्टेशनचे दर्शन घेता येणार
16 countries come together to build space station liquid study and research akola
16 countries come together to build space station liquid study and research akolaesakal

अकोला : अंतराळ अभ्यास व संशोधनासाठी जगातील १६ देशांनी एकत्र येऊन एक महाकाय अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) उभारले आहे. गुरुवार, ११ मे ते मंगळवार १६ मे या सहा दिवसांच्या काळात पहाटे व रात्री या स्पेस स्टेशनचे दर्शन घेता येणार आहे.

हे स्पेस स्टेशन साधारण ४०० किलोमिटर अंतरावरून पृथ्वी भोवती फिरत आहे. त्याचा वेग दर ताशी सूमारे २८ हजार किलोमीटर हा आहे. हे स्टेशन फिरताना जेव्हा आपल्या क्षेत्रात येईल, तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो. स्थानानुसार त्याच्या तेजस्वीपणात, वेळात व दिशेत बदल होऊ शकतो.

११ ते १६ मे या दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारावेळा या स्पेस स्टेशनचे प्रकाशणाऱ्या फिरत्या चांदणीच्या स्वरूपात दर्शन घेता येईल. हा सहा दिवसांचा अनोखे दृष्य आकाशप्रेमींनी जरूर पहावे, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

अंतराळ केंद्र दिसण्याचे वेळापत्रक

गुरुवार, ११ मे ः रात्री ७-१३ ते ७-१६ या वेळी दक्षिणेकडील आकाशात पूर्वेकडे जाताना. रात्री ८-४८ ते ८-५१ या वेळात पश्चिमेकडून उत्तर बाजूस जाताना.

शुक्रवार, १२ मे ः पहाटे ५-०२ते ५-०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे जाताना. रात्री ७-५९ ते ८-०६ यावेळी अधिक प्रमाणात नैॠत्य ते ईशान्य आकाशात प्रकाशताना.

शनिवार, १३ मे ः पहाटे ४-१३ ते ४-१८ या वेळात उत्तर-पूर्व बाजूला. रात्री ७-११ ते ७-१७ या वेळी नैॠत्य ते ईशान्य आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी दिसेल.

रविवार, १४ मे ः पहाटे ५-०१ ते ५-०८ या वेळात वायव्य ते आग्नेय आकाशात. रात्री ८ ते ८-०४ या वेळात पश्चिमेकडून उत्तर बाजूस जाताना.

सोमवार, १५ मे ः पहाटे ४-१३ ते ४-१९ या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे जाताना. रात्री ७-११ते ७-१६ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस.

मंगळवार, १६ मे ः पहाटे ३-२९ ते ३-३० या वेळात पूर्व आकाशात अगदी कमी वेळ. पहाटे ५-०२ ते ५-०६ या वेळात पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com