कोकण किनाऱ्याला २२ प्रकारची स्पॉन्जेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

रत्नागिरी - कोकणात खडकाळ, वालुकामय, दलदलयुक्त समुद्रकिनारे आहेत. तेथे आगळी वेगळी जैवविविधता नांदते. त्याचा अभ्यास करताना स्पॉन्जेसच्या २० ते २२ जाती आढळल्या व यांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली. या जलचरांची विविधता लक्षात घेता अतिशय साधी सोपी शरीररचना असलेले हे प्राणी आजही ५८० अब्ज वर्षांपूर्वी होते तसेच आहेत.

रत्नागिरी - कोकणात खडकाळ, वालुकामय, दलदलयुक्त समुद्रकिनारे आहेत. तेथे आगळी वेगळी जैवविविधता नांदते. त्याचा अभ्यास करताना स्पॉन्जेसच्या २० ते २२ जाती आढळल्या व यांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली. या जलचरांची विविधता लक्षात घेता अतिशय साधी सोपी शरीररचना असलेले हे प्राणी आजही ५८० अब्ज वर्षांपूर्वी होते तसेच आहेत. आता त्यांच्यावर अधिक काम सुरू आहे, अशी माहिती शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, कोकणची ७२० कि.मी. लांबीची किनारपट्टी अतिशय समृद्ध मानली जाते. मासळीच्या असंख्य जाती इतर जलचरांबरोबर इथल्या किनारपट्टीत मुबलक मिळतात. मासळीचे साठे अबाधित राहावेत, यासाठी येथील खारफुटीची वने आणि त्याचबरोबर इथे असणाऱ्या अनेकविध जैवविविधता (इकोसिस्टिम्स) म्हणजे अधिवासांचा विचार करावा लागेल. या अधिवासात अनेक अन्नसाखळ्या एकमेकांना एक सपोर्ट सिस्टीम पुरवत असतात. यामध्ये सूक्ष्म एकपेशीय वनस्पती व प्राणी प्लवंगांपासून मोठमोठ्या जलचरांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. स्पॉन्जेस हे बहुपेशीय प्राण्यांच्या उत्पत्तीतील पहिला दुवा आहेत. पोरिफेरा गटात मोडणाऱ्या स्पॉन्जेसच्या पाच ते दहा हजारांहून अधिक जाती जगभरात आढळतात.
कोकणच्या स्वच्छ खडकाळ किनारपट्टीत स्पॉन्जेस राहतात. त्यांची एवढी विविधता आपल्याकडे सापडते. ही दुसरी महत्वाची बाब. औषधी गुणधर्मामुळे अलीकडे स्पॉन्जेसच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. कृत्रिमरीत्या बनवलेल्या रासायनिक औषधांपेक्षा ही जैविक औषध चांगल्या प्रकारे काम करतात. पण ती मिळवण्यासाठी स्पॉन्जेसचे शाश्वत संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. मोहिते म्हणाल्या.

जगभरात स्पॉन्जेसवर संशोधन सुरू
जगभरात स्पॉन्जेसवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. ते म्हणजे स्पॉन्जेस स्वसंरक्षणासाठी अनेक जीवाणू आणि शैवाल यांना आपल्या सच्छिद्र शरीरात आसरा देतात. हे जीव स्पॉन्जेससाठी काही विशिष्ट रसायनांची निर्मिती करतात. ही जैविक रसायने अभ्यासली असता, ती जवळपास ३०० मानवी रोगांवर औषधे म्हणून काम करू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 types sponges found on Konkan beach