आता गुगल मॅप्स देणार हॉटेल्सचे 'बेस्ट डिल्स'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल. 

पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल. 

या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा करत गुगल मॅप्‍सचे संचालक क्रिश विटलदेवरा म्‍हणाले, '''आम्‍ही ऐकले आहे की, भारतीय मॅप्‍स युजर्स सुलभपणे उपलब्‍ध होईल असा अधिक सहाय्यक व व्हिज्‍युअल ब्राऊजिंगचा अनुभव पसंत करतात. ही बाब लक्षात घेत आम्‍ही रिडिझाइन, भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, फॉर यू फिचर आणि डायनिंग ऑफर्स सादर करत आहोत. यामुळे गुगल मॅप्‍स युजर्सना शहरातील ठराविक गोष्‍टींचा शोध घ्‍यायचा असो, डायनिंगवर ऑफर्स माहित करायचे असो किंवा त्‍यांच्‍या अद्वितीय आवडींनुसार वैयक्तिकृत शिफारसी घ्‍यायचे असो त्‍यांच्‍या शहरामध्‍ये नवीन पद्धतीने शोध घेण्‍यामध्‍ये मदत होईल.''

'एक्‍स्‍प्‍लोअर'  टॅब हा वन-टॅप मार्ग आहे, जो गुगल मॅप्‍सवर ठिकाणांनुसार करायचे असलेले डायनिंग, इव्‍हेण्‍ट्स आणि इतर गोष्‍टींसाठी सूचना देतो. आता भारतात गुगल मॅप्‍सवर केल्‍या जाणा-या प्रमुख चौकशी आणि लोकांच्‍या संवादाच्‍या पद्धतीच्‍या आधारावर एक्‍सप्‍लोअर टॅबमध्‍ये रेस्‍तराँ, पेट्रोल पंप्‍स, एटीएम, ऑफर्स, शॉपिंग, हॉटेल्‍स आणि केमिस्‍ट्स या सात नवीन शॉर्टकट्सची भर करण्‍यात आली आहे. मशिन लर्निंगचा वापर करत गुगल मॅप्‍स प्रत्‍येक शहरामधील या विभागांमधील अव्‍वल सूचनांना आपोआपपणे ओळखते.

युजर्स आता ''एक्‍सप्‍लोअर नीअरबाय''च्‍या बाजूला असलेल्‍या अॅरोवर टॅप करण्‍याद्वारे निवड करत त्‍यांच्‍या शहरातील आसपासच्‍या लोकप्रिय स्‍थळांचा शोध घेऊ शकतात. स्‍वत:च्‍या शहरामधील ठिकाणांचा शोध घेण्‍याव्‍यतिरिक्‍त युजर्स शहराचे नाव सर्च करत इतर भारतीय शहरांचा देखील शोध घेऊ शकतात. प्रवासाला जाण्‍यापूर्वी जलदपणे संबंधित प्रवासाच्‍या ठिकाणाकडे जाण्‍याचा मार्ग शोधण्‍याचा हा अगदी सोपा पर्याय आहे.

'फॉर यू' टॅब युजर्सना नवीन रेस्‍तराँ, प्रेक्षणीय स्‍थळे आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार करण्‍यात आलेल्‍या वैयक्तिक शिफारसीसंदर्भात माहिती देते. हे वैशिष्‍ट्य 'यूअर मॅच' स्‍कोअरचा देखील वापर करते, जे युजरने उच्‍च रेट करण्‍यात आलेले रेस्‍तराँ, आवडलेले पदार्थ आणि सर्वाधिक भेट देण्‍यात आलेली ठिकाणे यांसारख्‍या भर केलेल्‍या माहितीनुसार गुगल मॅप्‍सला लाखो ठिकाणांबाबत ज्ञात असलेल्‍या गोष्‍टींबाबत माहिती देण्‍यासाठी मशिन लर्निंगचा वापर करते. युजर्सने हे वैशिष्‍ट्य पहिल्‍यांदा लाँच केल्‍यानंतर ते त्‍यांची रूची असलेली क्षेत्रे/ठिकाणे निवडू शकतात आणि अधिक वैयक्तिककृत व संबंधित शिफारसी मिळवू शकतात.

युजर्स आता व्‍यवसाय देखील फॉलो करू शकतात आणि इव्‍हेण्‍ट्सबाबत संबंधित अपडेट्स, बातम्‍या मिळवू शकतात. तसेच त्‍यांनी 'फॉर यू' टॅबला पोस्‍ट केलेल्‍या अव्‍वल ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. हे वैशिष्‍ट्य युजर फॉलो करत असलेल्‍या मर्चंट्सच्‍या आधारावर इतर व्‍यवसायांची शिफारस देखील करेल. 'फॉर यू' टॅब एका टॅपमध्‍ये शहरातील विविध बाबींचा शोध घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी सुलभ, सहाय्यक अनुभव देते आणि काळानुरुप यामध्‍ये अधिक सुधारणा केल्‍या जातील. 

तसेच गुगल मॅप्‍स 'ऑफर्स' विभाग सादर करत आहे, जेथे युजर्स डील्‍स शोधू शकतात आणि दिल्‍ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, चेन्‍नई, कोलकाता, गोवा, अहमदाबाद, जयपूर, चंदिगढ आणि हैद्राबाद या प्रमुख ११ भारतीय शहरांमधील रेस्‍तराँमध्‍ये डील्‍स क्‍लेम करू शकतात. हे वैशिष्‍ट्य वापरण्‍यासाठी युजर्स एक्‍सप्‍लोअर टॅबमधील 'ऑफर्स' शॉर्टकटवर टॅप करू शकतात किंवा ऑफर्ससह रेस्‍तराँसाठी फिल्‍टर करू शकतात. ईजीडिनरच्‍या सहयोगाने ऑफर वैशिष्‍ट्य सादर करण्‍यात आले आहे, जेथे युजर्स आता ४,००० हून अधिक रेस्‍तराँमधील ऑफर्स शोधू शकतात. तसेच अधिक विभाग व भागीदार लवकरच यामध्‍ये सामील करण्‍यात येणार आहेत.

या सादरीकरणानिमित्‍त आजपासून गुगल मॅप्‍स युजर्सना १,५०० हून अधिक रेस्‍तराँमध्‍ये १५ दिवसांसाठी ईजीडिनर प्राइम ऑफर्ससह सर्व रेस्‍तराँमध्‍ये किमान २५ टक्‍क्‍यांची खात्रीदायी सवलत मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी युजर्स गुगल मॅप्‍सवर 'ऑफर्स'चा शोध घेत असताना ' एक्‍सक्‍लुसिव्‍ह'  टॅगचा शोध घेऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 news features by Google maps for Indians