देशातील 35टक्के महिलांना नकोय दुसरे अपत्य 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

महत्वाच्या दहा शहरातून 1500 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. हे प्रमाण शहरांत खूप आहे. 
"मदर्स डे'निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

भारतातील शहरी भागात काम करणाऱ्या 35 टक्के काम करणाऱ्या महिलांना दुसरे अपत्य नको. या महिलांनी दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण दिले असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांना वाढवण्यासाठीचा खर्च ही एकाच अपत्यावर थांबण्यामागची मुख्य कारणे असल्याचे सर्वेक्षणात दिसते. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील महिलांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. आपल्या अपत्यासाठी तुम्ही किती वेळ देता असा प्रश्‍नही महिलांना विचारण्यात आला होता. 

यावेळी पाचशेपेक्षा जास्त महिलांना दुसरं मूल नकोय. दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरे अपत्य नको आहे. काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सरकारने एक मूल असलेल्यांना कर सवलत, भत्ते द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे एक मूल संकल्पनेला प्रोत्साहन मिळू शकते, असे काही महिलांना वाटते. 
 
Web Title: 35% of working women don’t want a second child, survey says