5G नाही 6G साठी व्हा सज्ज; Nokiaच्या CEOनी केला लॉन्च टाइमलाइनचा खुलासा

2030 पर्यंत 6G मोबाइल नेटवर्क व्यावसायिकरित्या उपलब्ध होईल, असा दावा नोकियाचे (Nokia) ग्लोबल स्मार्टफोन ब्रँडचे सीईओ पेक्का लुंडमार्क (Pekka Lundmark) यांनी केला आहे.
6G technology
6G technology Sakal

सध्या जगभरात 5G नेटवर्क उपलब्ध नसताना, नोकियाचे (Nokia) ग्लोबल स्मार्टफोन ब्रँडचे सीईओ पेक्का लुंडमार्क (Pekka Lundmark) यांनी 2030 पर्यंत 6G मोबाइल नेटवर्क व्यावसायिकरित्या उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते, असं गिझनोचीनाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे,

लुंडमार्क म्हणाले की, "2030 पर्यंत, आज आपल्याला माहित असलेला स्मार्टफोन हा सामान्य इंटरफेस असणार नाही. यापैकी बर्‍याच गोष्टी थेट आपल्या शरीराशी संबंधित असतील."

6G technology
25 हजारांत मिळणारे बेस्ट 5G स्मार्टफोन्स, येथे पाहा यादी

कंपन्यांनी आधीच 6G मध्ये गुंतवणूक करण्यास केली सुरुवात-

लुंडमार्क यांनी याविषयी अधिक विस्तृतपणे सांगितले नाही, परंतु त्यांनी असे म्हटले की 2030 पर्यंत, प्रत्येक गोष्टीचे 'डिजिटल ट्विन' असतील, ज्यासाठी विशाल संगणकीय संसाधनं आवश्यक असतील. अहवालात असे म्हटले आहे की, कंपन्यांनी आधीच 6G मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

6G technology
देशात पहिल्यांदाच 5G कॉलची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी, पाहा VIDEO

Qualcomm, Apple, Google आणि LG सारख्या जगातील काही मोठ्या टेक कंपन्यांना या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात जगामध्ये 6G तंत्रज्ञान जगासमोर येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com