आधार कार्डद्वारेही होणार पैसे हस्तांतरित; भीम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhar Card

आनंदाची बातमी : आधार कार्डद्वारेही होणार पैसे हस्तांतरित

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आधार कार्डचा विविध कामांसाठी वापर होतो. कोणत्याही कामासाठी आधारच ग्राह्य धरला जातो. बॅंकेत खाते उघडण्यापासून तर नवीन सिमकार्ड विकत घेण्यासाठी आधार कार्डच मागितला जातो. यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. सरकारने याची सक्ती केल्याने नागरिकांनी लाइनीत लागून आधार कार्ड काढले होते. आता आधार कार्डच्या मदतीने पैसे पाठवता येणार आहे.

मोदी सरकार केंद्रात विराजमान झाल्यापासून डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यात येत आहे. कोणताही व्यवहार रोखीने न करता डीजिटलच्या माध्यमातून करण्याचे आवाहन करण्यात आले. देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर डिजिटल व्यवहारांत आणखी वाढ झाली. आता शिक्षणापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी डिजिटल प्रणाली वापरली जात आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून राजेंद्र मुळक मैदानात! नाव घोषित होण्याची प्रतीक्षा

भारतात आजही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या व्यक्तींना पैसे ट्रान्सफर करणे कठीण जाते. अशा नागरिकांची मदत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) भीम ॲप (BHIM) वापरणारे स्मार्टफोन किंवा UPI शिवाय प्राप्तकर्त्यांना आधार क्रमांक वापरून पैसे पाठवू शकतात.

भीम ॲप हा यूपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे. याद्वारे तुमचा मोबाइल नंबर किंवा नाव याचा वापर करून ‘रिअल टाइम फंड ट्रान्सफर’ला अनुमती देतो. UIDAI नुसार भीममध्ये प्राप्तकर्त्याचा पत्ता व आधार क्रमांक टाकल्यास पैसे पाठवण्याचा पर्याय दिसतो. तुम्ही भीम ॲपचे वापरकर्ते असाल आणि आधार क्रमांक वापरून पैसे पाठवायचे असतील तर तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: हिटमॅन म्हणाला, खेळाडूंना मैदानात स्वातंत्र्य मिळाला पाहिजे

असे पाठवा पैसे

आधार क्रमांक वापरून पैसे पाठवण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी भीम वापरकर्त्यांनी प्राप्तकर्त्याचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा. यानंतर सत्यापन बटण दाबावे. ही प्रणाली आधार लिंकिंगची पडताळणी करेल आणि प्राप्तकर्त्याचा पत्ता भरेल आणि वापरकर्ते UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार पैसे पाठवू शकतील.

असे होणार पैसे जमा

UIDAI नुसार DBT/आधार आधारित क्रेडिट मिळविण्यासाठी प्राप्तकर्त्याने निवडलेल्या बँक खात्यात हस्तांतरण केल्यावर पैसे जमा केले जातील. त्याच बरोबर आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंटचा वापर पेमेंट प्राप्त करण्यासाठी आधार पे POS वापरून व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो. एखाद्या वापरकर्त्याची एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असतील आणि सर्व खाती आधारशी जोडलेली असतील, तर सर्व खाती डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

बँक खाते निवडण्याचा पर्याय

UIDAI नुसार आधार आधारित पेमेंट करताना ज्या बँकेतून पेमेंट करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल. अशा प्रकारे वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी पेमेंट करताना बँक निवडण्याचा पर्याय दिसेल. तसेच आधार पे द्वारे पेमेंट करताना तुमचे खाते ऑनलाइन डेबिट केले जाईल.

loading image
go to top