Moto G73 5G : मोटोचा कमी किमतीत दमदार 5G फोन लॉन्च; जाणून घ्या कॅमेरा अन् प्रोसेसर बद्दल | Moto G73 5G price features & specifications | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affordable moto g73 5g launched in india with 50mp camera check price specifications

Moto G73 5G : मोटोचा कमी किमतीत दमदार 5G फोन लॉन्च; जाणून घ्या कॅमेरा अन् प्रोसेसर बद्दल

Moto G73 5G features: मोटोरोलाने शुक्रवारी आपला मिड-रेंज स्मार्टफोन Moto G73 5G भारतात लॉन्च केला आहे. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आणि 20 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Moto G73 5G मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 930 प्रोसेसर दिला आहे.

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठीही सपोर्टही आहे. त्याच वेळी, फोनसोबत ThinkShield मोबाइल सुरक्षा देखील उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि फीचर्स…

Moto G73 5G ची किंमत

Moto G73 5G भारतात सिंगल स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ल्युसेंट व्हाईट आणि मिडनाईट ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

हा फोन 16 मार्चपासून फ्लिपकार्ट तसेच निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. फोन निवडक बँक कार्ड्ससह खरेदी केल्यास रु. 2,000 सूट आणि Axis, HDFC, ICICI आणि SBI कार्ड्सवर दरमहा रु. 3,167 च्या नो-कॉस्ट EMI पर्यायांसह खरेदी करता येईल.

Moto G73 5G चे स्पेसिफीकेशन्स

Moto G73 5G ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये Android 13 उपलब्ध आहे आणि कंपनी फोनसोबत Android 14 अपडेट देणार आहे. त्याचबरोबर फोनसोबत तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्सही मिळणार आहेत.

फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G73 5G मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह (1,080x2,400 पिक्सेल) रिझोल्यूशन आहे. फोनला MediaTek Dimensity 930 प्रोसेसरसह 128 GB स्टोरेज क्षमता आणि 8 GB पर्यंत RAM मिळते.

Moto G73 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. दुसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड मॅक्रो डेप्थ शूटर आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

कंपनीने Moto G73 5G सह 5,000mAh बॅटरी दिली, जी 30W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबत बॉक्समध्ये चार्जरही उपलब्ध आहे.

इतर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, Wi-Fi 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.3, FM radio, GPS/A-GPS, NFC, LTEPP, GLONASS, Galileo, USB Type-C पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक उपलब्ध आहे.