अंतराळातील तंत्रज्ञानच्या आधारे रस्त्यावर धावणार इलेक्‍ट्रॉनिक वाहने 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे करत असलेल्या प्रकल्प आज यशस्वी झाला आहे. या प्रकल्पामध्ये अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान रस्त्यांवरील खासगी वाहनांमध्ये वापरणे शक्‍य झाल्याचे दिसले. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोग एका दुचाकीवर करण्यात आला आहे. इस्रो आणि एआरएआयने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून त्या दुचाकीची क्षमता एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटर धावते. हे प्रमाण पूर्वी 90 किलोमीटर असे होते. इस्रो आणि एआरएआय यांनी मिळून लिथियम ऑयर्न बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत. हे तंत्रज्ञान आणखी यशस्वी ठरले तर इलेक्‍ट्रॉनिक वाहनउद्योगाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते. 

रस्ते आणि राज्यमार्ग सचिव संजय मित्रा यांना या तंत्रज्ञानावर चालणारे एक मॉडेल दाखवण्यात आल्याची माहिती इस्रो आणि एआरएआयने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

इस्रो आणि एआरएआयने ज्या वाहनात अंतराळातील तंत्रज्ञान वापरले त्या गाडीमध्ये 48 वोल्ट आणि 50 ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी दोन तासांच्या चार्जिंगनंतर 90 किलोमीटर चालू शकते. ही गाडी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते. या तंत्रज्ञानातील लिथियम बॅटरीचे उत्पादनासाठी इस्रोने "भारत हेवी इलेक्‍ट्रिकल'यांच्याशी करार केला आहे. 

Web Title: After satellites, ‘desi’ lithium batteries to power electric vehicles in India

टॅग्स