Airbag in Scooter : आता दुचाकीलाही एअरबॅग; 'ही' कंपनी करणार गाडी लाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 honda

Airbag in Scooter : आता दुचाकीलाही एअरबॅग; 'ही' कंपनी करणार गाडी लाँच

Airbag in Scooter : दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यूही होतो. सरकारही वाढणाऱ्या अपघातांवर गंभीर असून, सातत्याने यात सुधारणा केल्या जात आहेत. वाढत्या मृत्युंची संख्या लक्षात घेऊन आता दुचाकी उत्पादक कंपन्या एअरबॅगसारखे सुरक्षा वैशिष्ट्ये आणण्यावर काम करत आहेत.

हेही वाचा: Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानी टू व्हीलर निर्माता कंपनी होंडा त्यांच्या दुचाकीमध्ये एअरबॅग्ज लावण्याच्या विचारात आहे. यासाठी कंपनीने नुकताच अर्जही सादर केला आहे.

नव्याने लावण्यात येणारी ही एअरबॅग दुचाकीच्या अगदी मध्यभागी बसवली जाणार आहे. लावण्यात येणारी ही एअरबॅग हँडलच्या मधोमध असल्याने अपघाताच्या वेळी यामुळे चालकाचे रक्षण होणार आहे. ही एअरबॅग कारमधील एअरबॅग्सप्रमाणेच काम करेल, परंतु कारमधील सिस्टमपेक्षा वेगळी असेल.

हेही वाचा: Airbag Policy : एअर बॅगची किंमत किती? कार मालकांना नितीन गडकरींचे उत्तर

मीडिया रिपोर्टनुसार 2009 मध्ये होंडाने थायलंड आणि जपानमध्ये PCX नावाची एक स्कूटर लाँच केली होती. या स्कूटरमध्ये एअरबॅगचा पर्याय देण्यात आला होता. आता पुन्हा कंपनी एअरबॅगसह ही दुचाकी लाँच करण्याच्या विचारात आहे.

काही देशांमध्ये बाईकवर अशाप्रकारच्या एअरबॅगची टेस्टिंगदेखील करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे होंडाच्या या स्कूटरशिवाय बाईकमध्ये एअरबॅगहीची सुविधा उपलब्ध असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Viral Video : ‘ओ पप्पा उठा की' जंगलच्या राजाचा आणि बछड्याचा क्युट व्हिडीओ पहाच

अलीकडे कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारच्या विचारधीन आहे. मात्र, यामुळे कारच्या किमतीत फरक पडेल असे वाहन उत्पादकांचे मत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दुचाकीमध्येही जर एअरबॅग देण्यात आल्यास दुचाकींच्या किमती नक्कीच वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांची सुरक्षा वाढणार आहे.

टॅग्स :accidentdeathBike