Airtel, Jio आणि Vi देतायत दररोज 3 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

एअरटेल, जिओ आणि Vi ने असे काही प्लॅन लाँच केले आहेत ज्यामध्ये तीन जीबीपेक्षा जास्त इंटरनेट डेटा दररोज मिळतो. याशिवाय झी5 आणि Disney+Hotstar VIP चे सबस्क्रिप्शनही फ्री दिले आहे. 

पुणे - स्मार्टफोन हातात आल्यापासून इंटरनेट डेटाचा वापर वाढला आहे. त्यामुळे टेलिकम्युनिकेशन कंपन्यासुद्धा ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देतात. यामध्ये फ्री कॉलिंगसह डेटाही दिला जातो. एअरटेल, जिओ आणि Vi ने असे काही प्लॅन लाँच केले आहेत ज्यामध्ये तीन जीबीपेक्षा जास्त इंटरनेट डेटा दररोज मिळतो. याशिवाय झी5 आणि Disney+Hotstar VIP चे सबस्क्रिप्शनही फ्री दिले जाते. 

एअरटेलचे 398, 448 आणि 558 रुपयांचे प्लॅन आहेत. या तिनही प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये याशिवाय झी5 चे सबस्क्रिप्शन मिळते. तर 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये  Disney+Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन मिळते. या दोन्ही प्लॅनची मुदत 28 दिवसांसाठी असून 558 रुपयांच्या प्लॅनची मुदत 56 दिवसांसाठी आहे. याशिवाय एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड चेंजसह फ्री हॅलोट्यून, विंक म्यूझिक, फास्टॅगच्या खरेदीवर 150 रुपयांचे कॅशबॅकसुद्धा मिळते. 

हे वाचा - मोबाइल रिचार्ज महागणार; पुढच्या महिन्यापासून टॅरिफ वाढण्याची शक्यता

जिओनेसुद्धा दररोज तीन जीबी डेटाचे इंटरनेट प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये 349, 401 आणि 999 रुपयांचे प्लॅन आहेत. यातील 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कसाठी 1 हजार नॉन जिओ मिनिटे मिळणार आहेत. तसंच जिओची प्रीमियम अॅप्स मोफत वापरता येणार आहेत. 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज तीन जीबी डेटा आणि याशिवाय 6 जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. त्यासोबतच  Disney+Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी फ्री मिळणार आहे. हे दोन्ही प्लॅन 28 दिवसांच्या मुदतीचे आहेत. तर 84 दिवस मुदतीचा 999 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3 हजार मिनिटे मिळतील. याशिवाय तीनही प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस करता येणार आहेत. 

हे वाचा - 500 रुपयांच्या आतील सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन

एअरटेल व्होडाफोनप्रमाणे Vi चेसुद्धा दररोज तीन जीबी डेटा देणारे प्लॅन आहेत. यात 405, 449 आणि 699 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. 405 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 90 जीबी डेटा मिळणार आहे. तसंच एक वर्षासाठी झी5 प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मिळेल. हा प्लॅन 28 दिवसांच्या मुदतीसाठी असणार आहे. 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 4 जीबी डेटा मिळत असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय व्हीआय मूव्हीज आणि टीव्हीचा अॅक्सेस मिळणार आहे. 699 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी असून यामध्ये डबल डेटा बेनिफिट ऑफर असल्यानं दररोज 4 जीबी डेटा मिळत आहे. तसंच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग करता येईल. याशिवाय फ्री नॅशनल रोमिंग आणि दरदिवशी 100 फ्री नॅशनल एसएमसही करता येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: airtel jio and vi per day 3 gb internet data plan