गुड न्यूज! फक्त १०० रुपयांत मिळणार १५ जीबी डेटा

वृत्तसंस्था
शनिवार, 4 एप्रिल 2020

डेटा ऍड -ऑन पॅक ऑफर

- एअरटेलचे बेसिक प्लान्स

नवी दिल्ली : कोरोनाच्या थैमानामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे घरातूनच काम करणार्याण एअरटेल वापरकर्त्यांसाठी  चांगली बातमी आहे. कंपनीने पोस्टपेडच्या वापरकर्त्यांसाठी एक विशेष डेटा ऍड -ऑन पॅक सादर केला आहे. या पोस्टपेड ऍड -ऑन पॅकमध्ये १०० रुपयांमध्ये १५ जीबी डेटा देण्यात येत आहे. याशिवाय कंपनी आणखी एक ऍड -ऑन पॅक देत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना ३५ जीबी पर्यंतचा डेटा देण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेटा ऍड -ऑन पॅक ऑफर :

सध्या आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांना दोन डेटा ऍड -ऑन पॅकची ऑफर एयरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. १०० रुपयांच्या ऍड -ऑन पॅकमध्ये कंपनी १५ जीबी डेटा देत आहे. हा पॅक कंपनीकडून जानेवारीमध्येच लाँच करण्यात आला होता, परंतु लॉकडाउन कालावधीत कंपनी 'घरातून सहजतेने काम' या टॅगद्वारे त्याचा प्रचार करीत आहे.  तसेच एअरटेलचा दुसरा डेटा ऍड -ऑन पॅक २०० रुपयांमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. या  २०० रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना ३५ जीबी डेटा मिळणार आहे.

एअरटेलचे बेसिक प्लान्स:

आपल्या सक्रिय प्लान्ससह हे पॅक जोडणे अगदी सोपे आहे. यासाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स ऍप मधील 'सर्व्हिसेस' विभागात जाऊन डेटा पॅकची सदस्यता घ्यावी लागेल.

वेगवेगळ्या राज्यात एअरटेलच्या पोस्टपेड प्लान्सच्या सुरुवातीच्या किंमतीत थोडा फरक आहे. अरुणाचल प्रदेश, दिल्ली / एनसीआर आणि तामिळनाडूमधील एअरटेलची सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ३४९ रुपयांपासून सुरु होतात. त्याचबरोबर अन्य राज्यात हे प्लान ३९९ रुपये आहे.

Bharti Airtel Now Offering 28GB of 4G Data Under Rs 150 - TelecomTalk

३४९ रुपयांच्या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी चर्चा केली तर आपल्याला ५ जीबी रोलओव्हर डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० विनामूल्य एसएमएस मिळतील. या प्लानची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात ग्राहकांना झी फाईव आणि एअरटेल प्रीमियम ऍपचे विनामूल्य सदस्यतादेखील दिली जाते.

३९९ रुपये मासिक भाड्याने घेतलेल्या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी ४० जीबी रोलओव्हर डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि १०० विनामूल्य एसएमएस देत आहे. झी फाईव आणि एअरटेल प्रीमियम ऍप  या योजनेत विनामूल्य देण्यात येत आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी त्यात मोबाईलवर वर विनामुल्य प्रोटेक्शन पॉलिसीसुद्धा देत आहे.

CRTC Scales Back its Internet Ambitions for Remote Areas | The ...

एअरटेलचे प्रीमियम प्लान्स :

एअरटेलच्या प्रीमियम पोस्टपेड प्लानमध्ये अमर्यादित डेटाचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. प्रीमियम प्लान हे मासिक भाडे ४९९, ७४९, ९९९ आणि १५९९ रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांमध्ये ७५  जीबी डेटापासून अमर्यादित डेटा ग्राहकांना ऑफर केला जात आहे.  या सर्व प्लान्समध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० विनामूल्य एसएमएस ग्राहकांना देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airtel Launch New Offer of Data Plan