
Airtel Prepaid Plans : आता Airtel 455 Plan वर मिळवा 'हे' बेनिफिट्स
Airtel Prepaid Plans : टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे स्वस्तातील अनेक प्लान्स आहेत. तुम्ही जर एअरटेलचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एका खास प्लानची माहिती देत आहोत. या प्लानमध्ये डेटा कमी मिळतो. परंतु, ८४ दिवसाची वैधता दिली जाते. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या ४५५ रुपयाच्या प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
Airtel 455 Plan सोबत मिळतात हे बेनिफिट्स
४५५ रुपये खर्चून लोकांना एअरटेलच्या या प्लान सोबत ६ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. जर तुमच्या घरात वाय फाय वापरला जात असेल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. डेटा शिवाय, एअरटेल आपल्या या स्वस्त प्लान सोबत फ्री मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉलिंगचे बेनिफिट्स देते. या प्लानमध्ये दररोज एसएमएसची सुविधा दिली जात नाही.
या प्लान सोबत फक्त एकूण ९०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये यूजर्सला ४५५ रुपये किंमतीत ८४ दिवसाची वैधता ऑफर केली जाते. अन्य बेनिफिट्स मध्ये फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, ३ महिन्यासाठी अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, याशिवाय, फ्री विंक म्यूझिक आणि हॅलो ट्यूनचा फायदा मिळतो.
Reliance Jio 395 Plan सोबत मिळतात हे फायदे
३९५ रुपयाच्या या प्लान सोबत कमीत कमी ८४ दिवसाची वैधता मिळते. या प्लान सोबत एअरटेलप्रमाणे यूजर्सला ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये एअरटेलच्या तुलनेत १०० एसएमएस एक्स्ट्रा दिले जाते. तुम्हाला या प्लानमध्ये एकूण १ हजार एसएमएस ऑफर केले जाते.