Recharge Plan : Airtel, Vodafone Idea अन् Jio चे हे बेस्ट प्लॅन देणार दर दिवशी 2 जीबी डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel, Vodafone Idea Jio Recharge Plan

Recharge Plan : Airtel, Vodafone Idea अन् Jio चे हे बेस्ट प्लॅन देणार दर दिवशी 2 जीबी डेटा

Recharge Plan : मोबाइल डेटा हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा घटक आहे.. मोबाईल डेटाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. कधी कधी दर दिवशी मिळणारा एक किंवा जीबी डेटा आपल्याला अपूरा पडतो. Vodafone Idea, Airtel, Jio आणि BSNL दर दिवशी 1.5 जीबी देतात. जर तुम्हाला हा डेटा अपूरा पडत असेल आणि तुम्ही दोन जीबी डेटा प्लॅनच्या शोधात असाल तर या प्रीपेट प्लॅनविषयी तुम्ही जाणून घ्या.

एअरटेल, वोडाफोन आयडीया आणि जिओ या तीन टेलीकॉम दिग्गज कंपन्या 1 जीबी पासून 3 जीबीपर्यंत डेली डेटा प्लान देतात. एवढंच काय तक वोडाफोनने स्पेशल डबल डेटा ऑफरपण जारी केलाय. आज आम्ही तुम्हाला असा डेटा प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये Airtel, Vodafone Idea अन् Jio कंपनी 2 जीबी हाय स्पीड डेटा दर दिवशी देणार आहे. चला तर जाणून घेऊया. (Airtel Vodafone Idea Jio best plan high speed 2 gb recharge data plan )

एअरटेलचा 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा सर्वात स्वस्त 2 जीबी डेली डेटा प्लॅन 252.54 रुपयांमध्ये सुरू होणार आहे. या प्लॅनमध्ये 2 जीबी हाय-स्पीड डेटा दररोज मिळणार आहे. हा प्लॅनसोबत मोफत अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंगसोबत 100 डेली एसएमएस पण मोफत मिळणार आहे. या प्लॅनची वॅलिडीटी 28 दिवसापर्यंत आहे. कंपनी 295.76 रुपयाचाही एक प्लॅनही देते ज्यामध्ये 252 रुपये प्लॅन सारखे फायदे आणि वॅलिडीटी असते पण यामध्ये अॅमेझॉनचे प्राइम सब्सक्रिप्शन फ्री असते.

वोडाफोन आयडीयाचा 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

Vodafone Idea लिमिटेड दिवसांसाठी स्पेशल डबल डेटा ऑफर देत आहे. अशात कंपनीचे 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डेटा मिळत आहे. या प्लॅन मध्ये सुरवातीला 2 जीबी डेली हाय-स्पीड डेटा मिळत होता तर आता लिमिटेड दिवसांसाठी या प्लॅनमध्ये 4 जीबी डेटा दर दिवशी मिळणार आहे.

याची वॅलिडीटी क्रमश: 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवस आहे. या तीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नेशनल कॉलिंग, 100 एसएमएसचा लाभ या प्लॅनमध्ये असणार आहे.

याशिवाय Vodafone यूजर्सच्या 499 रुपये किमतीचा Vodafone Play सब्सक्रिप्शन आणि 999 रुपये किमतीचा ZEE5 सब्सक्रिप्शन मिळणार आहेत. हे दोन्ही सब्सक्रिप्शन आयडीया ग्राहकांसाठी आहे.

रिलायंस जिओचा 2 जीबी डेली डेटा प्रीपेड रिचार्ज प्लान

जिओचा 249 रुपये, 444 रुपये, 599 रुपये आणि 2399 रुपयांच्या चार प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा दररोज मिळतो. याशिवाय यामध्ये 100 मोफत डेली एसएमएस आणि जिओचे मोफत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे.

जिओचे अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी या चार प्लॅनमध्ये क्रमश: 1,000, 2,000, 3,000 और 12,000 नॉन-जिओ FUP मिनिट मिळतात आणि याची वॅलिडीटी क्रमवार 28, 56, 84 और 365 दिवसापर्यंत असणार.

जिओजवळ 2,599 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे ज्याचे फायदे आणि वॅलिडीटी 2,399 रुपयांच्या प्लॅनशी सारखं आहे. मात्र या प्लॅनच्या युजर्सला 10 जीबी जास्त कुल डेटा आणि Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळणार.