esakal | एम्ब्रेन कंपनीची नवीन ट्रिमर्स आणि ग्रूमिंग किट लॉन्च, जाणून घ्या किंमत

बोलून बातमी शोधा

grooming kit
एम्ब्रेन कंपनीची नवीन ट्रिमर्स आणि ग्रूमिंग किट लॉन्च, जाणून घ्या किंमत
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतातील लाइफस्टाइल एक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एम्ब्रेन ब्रँडने आता पर्सनल केअर सेगमेंटमधील प्रॉडक्ट रेंजचा विस्तार केला आहे. कंपनीने Amazon आणि फ्लिपकार्ट वर पोर्टेबल मल्टी पर्पज ग्रूमिंग किट बाजारात लॉन्च केले आहेत. सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे वन स्टॉप सोल्यूशन आहे. हे दोन्ही प्रोडक्ट 365 दिवसांच्या वॉरंटीसह येतात .

एम्ब्रेन क्रुजर मिनी हाय टेक्नोलॉजी ग्रूमिंग किट आहे, त्याची किंमत 1699 रुपये आहे. हे वापरण्यासाठी मजबूत पकड आणि रबर फिनिशसह डिझाइन केलेले आहे. त्यास दोन हेड देखील देण्यात आले आहेत, जे वेगळे केले जाऊ शकतात. दाढी, मिश्या आणि केसांची स्टाईल करण्यासाठी हे 10 भिन्न सेटिंग्जसह येते. हे 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालविले जाऊ शकते. यात 600 एमएएच ची मजबूत लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. हे ट्रिमर कॉर्ड किंवा कॉर्डशिवाय चालविले जाऊ शकते. प्रवासादरम्यानही हे किट आपल्याबरोबर सहजपणे घेऊन जाता येईल. ही क्रूजर मिनी पोर्टेबल आणि स्टाइलिश स्टोरेज ट्रेसह येते जेणेकरून हे किट वापरुन आपण ताबडतोब केस, मिश्या आणि दाढी स्टाईल करु शकता.

ऑरा-एस ट्रिमर आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी, केस, दाढी आणि मिश्या घरी अतिशय चांगल्या पद्धतीने सेट करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. हे 20 वेगवेगळ्या लेन्थ सेटिंग्ज आणि दोन स्वतंत्र कंघीसह येते. एक शक्तिशाली बॅटरी असणारे हे ट्रिमर 90 मिनिटांचे ट्रिमिंग कॉर्डलेस पद्धतीने करते. IPX7 वॉटरप्रूफ रेटिंगसह सुसज्ज या ट्रिमरची किंमत 1499 रुपये आहे. या ग्रूमिंग रेंजमध्ये एक नवीन उत्पादन ऑरा-एक्स ट्रिमर आहे. हे 17 वेगवेगळ्या लेन्थ सेटिंग्ज आणि कॉम्बसहित येते.

लांब आणि लहान केसांच्या एडजेस्टमेंट यात फिरणारी 0.5 मिमी ते 10 मिमी कॉम्ब असते. त्याचे ब्लेड उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आहेत, जे अचूक आणि सहज केस ट्रिमिंग किंवा दाढी करतात. त्यात कोणताही कट आणि स्क्रॅच येणार नाही. हा ट्रिमर स्मार्ट एलईडी लाइटसह येतो. त्याचे चार्जिंग खूप वेगवान आहे, जी 2 तास चालते. ऑरा-एक्स ट्रिमरची किंमत 1299 रुपये आहे. हे आपल्याला घरी एक चांगला सलून अनुभव देते. पर्सनल केअर रेंजमध्ये नवीनग्रूमिंग प्रॉडक्ट्स लॉन्च करुन एम्ब्रेन ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहे.