ही ऍप तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मूमेंट्‌स बाय फेसबुक 
तुमचा मित्रांसोबतचा किंवा कुटुंबासोबतचा एखादा फोटो अल्बम तयार करण्यासाठी तुम्ही हे ऍप वापरू शकता. याद्वारे तुम्ही मित्रांना हवे तेव्हा आणि जलदगतीने फोटो पाठवू शकता व ते परतही घेऊ शकता. केवळ फोटोच नव्हे; तर यामध्ये तुम्ही व्हिडिओही ठेवू शकता. फेसबुकद्वारे या ऍपची निर्मिती असल्याने ते यूजर फ्रेंडली आहेच, तसेच याद्वारे तुम्ही स्लाईड शो किंवा व्हिडिओही तयार करू शकता.  

ओपनटेबल 
तुम्हाला खाण्याची आवड आहे, परंतु ऐनवेळी प्लॅन ठरल्यानंतर रेस्टॉरंटबाहेर रांगेत उभे राहणे आवडत नाही, तर तुम्ही या ऍपची मदत घेऊ शकता. या ऍपद्वारे तुम्ही नवी हॉटेल्स त्यांचे मेन्यू कार्डस आदींची तपशिलवार माहिती पाहू शकता व तुमच्या आवडीनुसार हॉटेलमधील टेबलही बुक करू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचेलच आणि आवडीच्या पदार्थांची लज्जतही चाखता येईल. 

ब्ल्यू मेल

निरनिराळ्या मेल सर्व्हिसवरून येणारे मेल्स एकत्रितपणे पाहण्यासाठी तुम्ही हे ऍप वापरू शकता. या ऍपमध्ये तुम्ही तुमचे अकाउंट लिंक करून सर्व ई-मेल्स एकाच ठिकाणी पाहू शकता व त्यावर कामही करू शकता. वेगवेगळ्या मेल्सना वेगवेगळे रंग देऊन त्यांचे वर्गीकरण करण्याची सुविधाही या ऍपमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ऍपमध्ये मेल्सच्या संख्येबाबत कोणतीही मर्यादा नसल्याने तुम्ही कितीही मेल्स याद्वारे पाहू शकता. 

साउंड मीटर 
तुमच्या अवतीभोवती असलेल्या आवाजाची मर्यादा जाणण्यासाठी हे ऍप आहे. सभोवतालच्या परिसरातला आवाज मोजून तो किती डेसिबल आहे आणि तो सामान्य आहे की जास्त हेदेखील या ऍपद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. अत्यंत सोप्या ग्राफिक्‍सच्या माध्यमातून येथे आवाजाची मर्यादा दाखविली जात असून सर्वसामान्य माणसालाही ती कळू शकते. 

Web Title: Appication in your smartphone