Appleचं हे प्रोडक्ट एअरलाईनकडून बॅन, आता प्रवाशांना लगेजमध्ये नेता येणार नाही; कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Air Tag

Appleचं हे प्रोडक्ट एअरलाईनकडून बॅन, आता प्रवाशांना लगेजमध्ये नेता येणार नाही; कारण..

Apple Airtagचा वापर बरेच लोक करतात. विशेषत: फ्लाइटमध्ये याचा जास्त वपर केला जातो. एअरटॅगच्या मदतीने लोक लगेज ट्रॅक करतात. मात्र आता एअरलाइनने यावर बॅन लावलाय. आता कंज्युमर्स त्यांच्या लगेजला ॲप्पल एअरटॅग लावू शकणार नाहीत. आणि काही लोक ठेवतही असतील तर आता अशांना एअरटॅग ऑफ ठेवावे लागेल. 'Lufthansa' या एअरलाइनने Apple Airtag बॅन केलेत. त्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.

काय आहे एअरलाइनचं म्हणणं?

Lufthansa एअरलाइनच्या मते, एअरलाइनने ICAOच्या गाइडलाइनला लक्षात घेता हा निर्णय घेतलाय. एअरलाइनने याबाबत माहिती दिली आहे. एअरटॅग लगेजमध्ये ठेवणं धोक्याचं ठरतं. असे ICAOच्या गाइडलाइनमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे. एअरटॅग लगेजमध्ये ऑन असल्यास ते धोक्यास पात्र ठरू शकतं. त्यामुळे Lufthansa कंपनीने याला बॅन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र रिपोर्टनुसार ICAOचा दावा ॲप्पल डिवायसेसबाबत खोटा ठरतो. कारण कंपनीने ज्या ICAOच्या गाइडलाइननुसार टॅग बॅन केलेत त्या गाइडलाइन लीथियम आयर्न बॅटरी डिवायसेससाठी होत्या.

हेही वाचा: Airlines : अमेरिकेत वादळाचा कहर; 6 हजारहून अधिक उड्डाणं रद्द

काय सांगतात नियम?

ICAOच्या गाइडलाइनमध्ये १५ इंच स्क्रिनचे Apple Macbook Pro यांचा समावेश आहे. अॅप्पल एअरटॅगमध्ये या तुलनेत फार कमी व्होल्टची बॅटरी आहे. यामध्ये CR2032 बॅटरीचा वापर केला जातो. त्यामुळे ICAOच्या गाइडलाइनमध्ये अॅप्पल एअरटॅगचा समावेश नसला तरी CR2032 बॅटरीचा वापर एअरलाइन क्षेत्रात धोकादायक ठरतो. मात्र कंपनीच्या या निर्णयाला अनेक रिपोर्टने खोटं ठरवत असा दावा केलाय की, कंपनीने त्यांचं मिसमॅनेजमेंट लपवण्यासाठी हा निर्णय घेतलाय.