दर महिन्याला होतोय Out Of Limit खर्च? 'हे' मोबाईल ॲप्स करतील तुमचा अनावश्यक खर्च कंट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money Budget Controlling App

दर महिन्याला होतोय Out Of Limit खर्च? 'हे' मोबाईल ॲप्स करतील तुमचा अनावश्यक खर्च कंट्रोल

Money Control App: प्रत्येक व्यक्ती महिन्याच्या शेवटी महिन्याभऱ्यात झालेला खर्च लिहून ठेवतो. किंवा त्याचा हिशोब ठेवतो. हा हिशोब महिन्याच्या शेवटी पगारातले नेमके किती पैसे खर्च झालेत आणि किती उरलेत याचा अंदाज तुम्हाला देतो. मात्र आता तुम्हाला एवढं सगळं करण्याचीही गरज उरणार नाही कारण आता मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचा खर्च कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ॲपचाही वापर करू शकता.

तुमच्या पर्सनस बजेटला मॅनेज करण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. चला तर पैशांची मॅनेजमेंट करणारे अत्यंत उपयोगी अॅप कोणते ते जाणून घेऊया.

वॉलेट

वॉलेट हा फार चांगला व्हिज्युअल मनी मॅनेजर ॲप आहे. या ॲपमध्ये फ्री आणि पेड फिचर्स आहेत. फ्री अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमचा खर्च मॅन्युअली अपडेट करावा लागतो. मात्र तुम्हाला दोन आठवडे फ्री टेस्टींग मिळते. या ॲपमध्ये वेगवेगळे अकाऊंट एका ठिकाणी जोडण्याचं भारी फिचर तुम्हाला मिळतं. हे पॅकेट तुमची इनकम आणि खर्चाचा रेकॉर्डही ठेवतं.

हेही वाचा: Multitasking Tips: IAS महिलेने सांगितले १० Apps ज्याचा तुम्हाला होईल फायदा

मनी मॅनेजर

मॅनी मॅनेजरसह तुम्ही तुमचा खर्च सहज ट्रॅक करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या खर्चाचा ग्राफ चेक करू शकता. हे ॲप तुम्हाला अनलिमिटेड अकाऊंट जोडण्याची सुविधा देते. या ॲपच्या फ्री वर्जनमध्ये तुम्हाला तीन अकाऊंट जोडता येऊ शकतात.

मनी फाय

बिगिनर्ससाठी हा बेस्ट ॲप आहे. हे ॲप तुमच्या खर्चांवर नजर ठेवण्यास मदत करते. दर वेळी जेव्हा तुम्ही यात तुमचा खर्च ॲड करता तेव्हा एक कॅल्क्युलेटर आपोआपच पॉपअप होऊन जातं. या ॲपचं प्रिमियम वर्जन १९९ रुपयांपासून सुरू होतं.

टॅग्स :moneyAppBudget