‘ॲप’निंग : ब्राउझर एक, उपयोग अनेक

UCBrowser
UCBrowser

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध गोष्टी शोधण्यासाठी लागणारी मुख्य बाब म्हणजे मोबाईल इंटरनेट ब्राउझर. या इंटरनेट ब्राउझरमुळे अत्यंत कमी वेळात सर्फिंग करता येते. इतकेच नव्हे तर आपल्याला आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींची माहिती क्षणार्धात मिळवता येते. मोझिला फायरफॉक्‍स, गुगल क्रोम, ओपेरा मिनी, सफारी आणि यूसी ब्राउझर यांसारखे अनेक इंटरनेट ब्राउझर सध्या उपलब्ध आहेत.  

यूसी ब्राउझर प्रामुख्याने दोन प्रकारांत उपलब्ध आहे. यूसी ब्राउझर आणि यूसी ब्राउझर मिनी असे हे प्रकार आहेत. यातील यूसी ब्राउझर या ॲपची फाइल साईज ५४ एमबी असून, यूसी ब्राउझर मिनी या ॲपची फाइल साइज ४ एमबीपर्यंत आहे. दहा कोटींपेक्षा अधिक यूझर्सनी हे ॲप आतापर्यंत वापरले आहे. या ॲपला ४.२ स्टार रेटिंग देण्यात आले आहे. हे ॲप फक्त सर्फिंगसाठी नसून, त्याच्या माध्यमातून एकापेक्षा अनेक गोष्टींचा वापर करता येतो. त्यामुळे त्याला ‘ऑल-इन-वन’ म्हटले तर वावगे ठरणार नाही.

विविध भाषांमध्ये उपलब्ध
यूसी ब्राउझर हे ॲप जवळपास चौदा भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यात हिंदी, तमीळ, मराठी, तेलुगू, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळी, इंग्रजी, पंजाबी, ओरिया, उर्दू, आसामी आणि भोजपुरी आदी भाषांचा समावेश आहे. आपण मराठी भाषा निवडली, तर त्यानुसार कंटेट उपलब्ध असेल. या ब्राउझरमधून फक्त इंटरनेट सर्फिंग करता येते असे नाही, तर इतरही अनेक गोष्टी करता येतात. 

या ॲपच्या माध्यमातून शॉपिंगही करता येते. त्यानुसार ‘ॲमेझॉन,’ ‘फ्लिपकार्ट,’ ‘स्नॅपडील’ यांसारख्या साइट्‌सवर या ॲपच्या माध्यमातून थेट जाता येईल. त्यासाठी कोणतीही विशिष्ट ‘यूआरएल’ टाकण्याची गरज नाही.

क्रिकेटच्या घडामोडीही समजणार
क्रिकेटचे सामने सुरू असतात, तेव्हा त्यातील प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. क्रिकेटविश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी या ॲपमध्ये यूसी क्रिकेट, हॉटस्टार हे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे यूझर्सना याचा मोठा फायदा होईल. या ॲपच्या माध्यमातून अनेक भाषांमधील चित्रपट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ‘यू-ट्यूब’ चॅनेलही देण्यात आले आहे. शिवाय चित्रपटाची गाणी ऐकण्यासाठी ‘गाना,’ ‘सावन’ आणि ‘हंगामा’ यांसारख्या साइटची लिंक देण्यात आली आहे. याशिवाय ‘एचडी मूव्ही’ असा पर्यायही आहे. 

जगभरात काय घडामोडी सुरू आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण बातम्यांचा शोध घेत असतो. त्यासाठी विविध प्रसारमाध्यमांच्या साइट पाहत असतो. ही सोयदेखील या ॲपमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठीसह इतर काही भाषांमध्ये बातम्या त्यावर उपलब्ध आहेत. प्रवास करायचा असल्यास या ॲपच्या माध्यमातून रेल्वे तिकीट, बस तिकीट आरक्षित करता येईल. त्यासाठी यात विशेष पर्याय देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर टॅक्‍सी सेवेसाठी ‘ओला कॅब’चीही सोय आहे. या माध्यमातून टॅक्‍सी बुक करता येऊ शकेल. सध्या नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत, याची निश्‍चित माहिती मिळत नाही. मात्र, ही माहिती मिळविणे आता एका क्‍लिकवर शक्‍य आहे. या ॲपच्या माध्यमातून सरकारी कार्यालये, बॅंका आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com