esakal | ‘ॲप’निंग : चांगले पालक होण्यासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

top-parent

‘टॉप पॅरेंट’ ॲपने पालकांसाठी काही गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसोबत करता येणाऱ्या विविध ॲक्‍टिव्हिटी, खेळ, व्हिडिओच्या स्वरूपात विविध गोष्टी या ॲपमध्ये उपलब्ध आहेत.

‘ॲप’निंग : चांगले पालक होण्यासाठी...

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीच्या काळात पती- पत्नी दोघेही नोकरदार असतील तर ते खूपच व्यग्र असतात. त्यामुळे लहान मुलांकडे म्हणावे तसे लक्ष देणे त्यांना शक्‍य होत नाही. तेव्हा लहान मुलांशी कसे वागायचे, त्यांना हाताळायचे कसे, त्यांना शिक्षण कसे द्यायचे असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे असतात. रोज-रोज तेच ते खेळ खेळून मुलेही कंटाळत आहेत. सध्या शाळा बंद असल्याने त्यांचा खूप वेळ घरातच जातो आणि त्यांना नवीन काही शिकायला मिळत नाही. त्यांचे खेळणे- बागडणे सध्या तसे पाहिले तर बंदच आहे. अशा वेळी त्यांचे खेळणेही होईल आणि काहीतरी शिकायलाही मिळेल, अशा नवीन गोष्टीची मुलांना नितांत आवश्‍यकता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विशेषतः तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांना हाताळणे सध्याच्या काळात खूपच कठीण झाले आहे. अशा वेळी या कामाकरिता एक सर्वोत्तम पर्याय म्हणून ‘टॉप पॅरेंट’ ॲप उपलब्ध आहे. ‘टॉप पॅरेंट’ ॲपने पालकांसाठी काही गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसोबत करता येणाऱ्या विविध ॲक्‍टिव्हिटी, खेळ, व्हिडिओच्या स्वरूपात विविध गोष्टी या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग पालक आपल्या पाल्यांना हाताळण्यासाठी, त्याला विविध गोष्टी शिकवण्यासाठी करू शकतात. तीन ते आठ वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष न देता आल्यास त्यांचा शैक्षणिक दर्जा घसरतो, तसे होऊ नये यासाठी हे ॲप मदत करते. 

‘टॉप पॅरेंट’ ॲपसंबंधी काही प्रश्न असल्यास आपल्या प्रोफाईलवर काही प्रश्नांची उत्तरे ॲपकडून आधीच देऊन ठेवलेली आहेत. यामध्ये तुमचा स्कोअर कधी कमी होतो? या ॲपचा उपयोग कोणासाठी आहे? आपला आताचा स्कोअर किती आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर स्कोअर बोर्ड नावाच्या पर्यायावर ॲपवरील टॉप दहा पालकांचा स्कोअरबोर्डही दाखविण्यात येतो. तसेच ‘टॉप क्विझ’ नावाच्या पर्यायातून आपण प्रश्नोत्तरांचे खेळही खेळू शकतो. ‘टॉप क्विझ’ पर्यायामध्ये प्रश्न विचारण्यासाठी काही गट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मानसिक विकास, आहार, बालसुरक्षा, नातेसंबंध या मुद्‌द्‌यांचा समावेश आहे. या गटाच्या माध्यमातून संबंधित प्रश्न विचारले जातात.  तसेच, व्हिडिओच्या पर्यायामध्येही काही गट करण्यात आले आहेत. यामुळे आपल्याला हव्या असलेल्या व्हिडिओपर्यंत सहज पोहोचता येते.

उपलब्ध सुविधा

  • या ॲपमध्ये ‘टिकटॉक’प्रमाणे व्हिडिओ उपलब्ध आहेत. 
  • या व्हिडिओंच्या मदतीने पालकांना आपल्या पाल्यांना कसे शिकवावे याबद्दलची माहिती मिळते.
  • या ॲपमध्ये मुलांच्या सुरक्षेचाही विचार करण्यात आला आहे. 
  • हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे.
  • आणखी उपयुक्त ॲपसंबंधी माहिती उपलब्ध असून, डाउनलोड करण्याचा पर्यायही आहे.
  • आई-वडिलांसाठी सूचनांचाही पर्याय उपलब्ध.
  • फीडबॅक नावाचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे. फीडबॅकच्या माध्यमातून आपल्या सूचना किंवा आपले अनुभव आपण शेअर करू शकतो. 
loading image
go to top