Ather 450S : एथरची सर्वात स्वस्त ई-स्कूटर समोर; 115 किलोमीटर रेंज; पाहा किती आहे किंमत

ही स्कूटर बाजारात कधी येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
Ather 450S
Ather 450SEsakal

एथर कंपनीने आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त ई-स्कूटर समोर आणली आहे. 450S असं या स्कूटरचं नाव आहे. ही स्कूटर बाजारात कधी येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, याची किंमत कंपनीने आधीच जाहीर केली आहे.

एथरने 450S स्कूटरचा (Ather 450S) टीजर लाँच केला आहे. यामध्ये याची रेंज आणि किंमत सांगितली आहे. या स्कूटरच्या बेस मॉडेलची किंमत 1,29,999 (एक्स शोरूम) असणार आहे. ही गाडी लवकरच लाँच होणार असल्याची माहिती टीजरमध्ये देण्यात आली आहे.

Ather 450S
E-Luna : नवी पिढीही म्हणणार 'चल मेरी लूना'; इलेक्ट्रिक स्वरुपात परत येतेय प्रसिद्ध मोपेड

115 किमी रेंज

एथर 450S इलेक्ट्रिक स्कूटरचे बाकी फीचर्स (Ather 450S features) अद्याप सांगितले नसले, तरी याची रेंज जाहीर करण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 115 किलोमीटर अंतर धावू शकते. तसेच, याचा टॉप स्पीड हा 90 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

या स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचा चार्जिंग टाईम, एक्सलरेशन टाईम याबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही. किंमत कमी असल्यामुळे कंपनीच्या इतर स्कूटरमध्ये मिळणारे प्रीमियम फीचर्स या गाडीमध्ये मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ather 450S
Electric Bikes : आजपासून इलेक्ट्रिक बाइक्सच्या किंमती वाढल्या; मोदी सरकारच्या 'या' निर्णयाचा फटका

ई-स्कूटरच्या किंमती वाढल्या

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक जूनपासून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सबसिडी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक बाईक्सच्या किंमती वाढल्या आहेत. ओला, टीव्हीएस अशा प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या गाडीच्या किंमती वाढवलेल्या असताना एथरने स्वस्त गाडी लाँच करुन टायमिंग साधलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com