
Auto Tips : बाहेर कितीही उकाडा असेल तरी गाडीची केबिन थंडच राहील, असा ठेवा AC मेंटेन
Car AC Maintenance Tips : उन्हाळा आला आहे, उन्हापासून वाचण्यासाठी बहुतेक जण कारने प्रवास करायला पसंती देतात. कारमध्ये एयर कंडीशनिंग सिस्टम असल्याने लोकांना खूप फायदा होतो, अशा परिस्थितीत तुमच्या कारचा एसी नीट काम करण्याची आवश्यकता आहे तरच तुम्ही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकता. यासाठी गाडीच्या एसीच्या देखभालीकडे लक्ष द्यावे लागते. बहुतेक लोक गाडीचा एसी सांभाळत नाहीत त्यामुळे गाडीचा एसी लवकर खराब होतो आणि प्रवासात तुमची सगळी मजाच निघून जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एसीचा मेंटेनन्स कसा करायचा. यासाठी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायची.
फिल्टर स्वच्छ ठेवा
कारमधील एसी सिस्टीम फिल्टरसह येते जी कारच्या केबिनमध्ये लावली जाते. अशा परिस्थितीत, उन्हाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण हे फिल्टर तपासले पाहिजेत. जर हे फिल्टर खराब झाले असतील तर ते त्वरित बदलले पाहिजे. हे काम अगोदर केले तर कडक उन्हाचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही हे फिल्टर मेकॅनिकद्वारे बदलून घेऊ शकता किंवा तुम्ही ते स्वतः बदलू शकता.
एसी सिस्टीम सर्व्हिसिंग करून घ्या
बहुतेक लोक एसीच्या सर्व्हिसिंगकडे फारसे लक्ष देत नाहीत. जे लोक कारचा एसी जास्त वापरतात त्यांनी वेळोवेळी मेन्टेनन्स करताना फिल्टर बदलायला हवा. जर तुम्ही कारच्या एसीचा वापर कमी केला तर एसीची गळती, रेफ्रिजरंट लेव्हल आणि ब्लॉकेजेसची तपासणी करा. याशिवाय, एसीला पॉवर देणारे बेल्ट वेळोवेळी तपासले पाहिजेत.
एसी लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
कारचा एसी मेंटेन ठेवण्यासाठी, कार सुरू करताच एसी फुल मोडवर सुरू करू नका. एसी सुरू करण्यापूर्वी, कार थोडी गरम होऊ द्या. जर तुम्ही गाडी सुरू करताच एसी चालू केला तर सर्वात कमी सेटिंगमध्ये एसी सुरू करा. यानंतर कारची खिडकी उघडा जेणेकरून गरम हवा बाहेर येईल. यानंतर हळूहळू एसीचा स्पीड वाढवा.