जानेवारीत वाहन विक्री 23.21% घसरली; SIAM च्या रिपोर्टमधून माहिती

Automobile sales in January 2022 have seen decline of 23 21 percent
Automobile sales in January 2022 have seen decline of 23 21 percent

जानेवारी 2022 मध्ये एकूण वाहन विक्रीत (Automobile Sale) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षी 23.21% इतकी घट झाली आहे, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने शुक्रवारी सांगितले. या वाहन उद्योग संस्थेनुसार, जानेवारी 2021 मध्ये विक्री झालेल्या 17,33,276 युनिट्सच्या तुलनेत या वर्षी जानेवारीमध्ये प्रवासी, व्यावसायिक आणि दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह 14,06,672 वाहनांची विक्री झाली.

दरम्यान वाहन विक्रीत घट होण्यामागील कारणांचा खुलासा करताना, ओमिक्रॉन-संबंधित चिंता आणि सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे जानेवारी 2022 मधील विक्री जानेवारी 2021 च्या तुलनेत पुन्हा घसरली. एंट्री-लेव्हल मॉडेल्सची ग्रामीण भागात मागणी कमी असल्यामुळे दुचाकींच्या मागणीत घट असल्याचे, SIAM चे महासंचालक राजेश मेनन म्हणाले.

या युनीट्सच्या विक्रीत घसरणीमुळे, भारतातील कारखान्यांकडून डीलर्सकडे प्रवासी वाहन पाठवण्याचे प्रमाण जानेवारीमध्ये 8% कमी झाले. सेमीकंडक्टरचा तुटवडाही त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

Automobile sales in January 2022 have seen decline of 23 21 percent
कुटुंबासाठी सुरक्षित असेल अशी कार शोधताय? हे आहेत काही बेस्ट ऑप्शन

जानेवारी 2022 मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री 2,54,287 युनिट्सवर गेली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 2,76,554 युनिट्स होती. गेल्या महिन्यात, प्रवासी कार पाठविण्याचे प्रमाण 1,26,693 युनिट्स इतके होते, जे मागील वर्षीच्या कालावधीत 1,53,244 युनिट होते. त्याचप्रमाणे, जानेवारी 2021 मध्ये 11,816 युनिट्सवरून व्हॅन डिस्पॅचमध्ये घट होऊन 10,632 युनिट्स झाली. मेनन यांच्या म्हणण्यानुसार, पुरवठ्याच्या बाजूच्या आव्हानांमुळे प्रवासी वाहन विभाग बाजारातील मागणी पूर्ण करू शकत नाही.

Automobile sales in January 2022 have seen decline of 23 21 percent
प्रेमप्रकरणातून तरुणीने युवकास जिंवत जाळले! नाशिक जिल्ह्यात खळबळ

युटिलिटी वाहनांची विक्री मात्र जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,16,962 युनिट्सपर्यंत वाढली आहे.

एकूण टू-व्हीलर डिस्पॅच 21 टक्क्यांनी घसरून 11,28,293 युनिट्सवर आले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 14,29,928 युनिट होते. त्याचप्रमाणे तीनचाकी रिटेल विक्री जानेवारी 2021 मध्ये 26,794 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 24,091 युनिट्सवर घसरली.

Automobile sales in January 2022 have seen decline of 23 21 percent
आधार कार्डमध्ये जन्मतारीख चूकलीय? घरबसल्या करा दुरुस्त, पाहा प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com