व्हॉटसऍपवरील Invitation Link पासून सावध रहा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - व्हॉटसऍप या लोकप्रिय मेसेंजर ऍपने मंगळवारपासून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर काही वेळातच ही सुविधा वापरण्यासाठी Invitation Link व्हायरल झाली. वास्तविक सध्या तरी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा वापरण्यासाठी व्हॉटसऍप अपडेट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हॅकर्स जागृत झाले आणि त्यांनी बनावट लिंक व्हायरल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच 'You're invited to try WhatsApp Video Calling feature. Only people with the invitation can enable this feature' अशा आशयाचा संदेश आणि सोबत एक लिंक व्हायरल झाली. नवी सुविधा वापरण्याच्या उत्सुकतेपोटी युजर्स अशा लिंकवर क्‍लिक करण्याची शक्‍यता अधिक होती. मात्र संबंधित लिंक ही स्पॅम वेबसाईटची होती. त्यावर क्‍लिक केल्यानंतर एका अनोळखी आणि असुरक्षित वेबसाईट दिसत होती. या स्पॅम वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्याची सूचना दिसत होती. विशेष म्हणजे हुबेहूब व्हॉटसऍपची अधिकृत वेबसाईट वाटावी अशीच सारी रचना या स्पॅम साईटवर करण्यात आली होती. त्यामुळे एखाद्या युजरने रजिस्ट्रेशन केले तर त्याच्या स्मार्टफोनवरील माहिती सहजपणे हॅक करता येणे हॅकर्स सहज शक्‍य होते. त्यामुळे युजर्सनी सुरक्षित राहून व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून अथवा ऍपल स्टोअरवरून व्हॉटसऍप अपडेट करणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

Web Title: Be aware from WhatsApp Video Calling feature invitation