जुन्या पद्धतीची स्कूटर हायटेक फीचर्ससह लॉन्च

यामध्ये तुम्हाला 3.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल. हा बॅटरी पॅक ३ हजार १०० डब्ल्यू पॉवरच्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे.
BGauss D15
BGauss D15 google

मुंबई : बाजारात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी तेजीत आहे. लोक इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

BGauss D15
फक्त ५ हजार भरा आणि ७२ हजारांच्या स्कूटरचे मालक बना

अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या BGauss D15 या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत.

BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये :

कंपनीने अलीकडे BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. आकर्षक डिझाईन, चाकांचा आकार आणि अधिक रेंज यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर लोकांना आवडते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये तुम्हाला 3.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल. हा बॅटरी पॅक ३ हजार १०० डब्ल्यू पॉवरच्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनी BLDC तंत्रज्ञानावर आधारित मोटर पुरवते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला जबरदस्त रेंज मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेला बॅटरी पॅक पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर ११५ किमीपर्यंत चालवता येते.

BGauss D15
१३ हजारांचा फोन ७४९ रुपयांत खरेदी करण्याची संधी

BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत :

ही इलेक्ट्रिक स्कूटर ६० किमी प्रतितास वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय आकर्षक लुकसह येते. कंपनीने तिच्या सर्वोत्तम BGauss D15 इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे आणि जर तुम्ही तिचा टॉप व्हेरियंट विकत घेतला तर तुम्हाला १ लाख १५ हजार रुपये खर्च करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com