
Global Warming : तुम्ही-आम्ही नाही तर, हे पैसेवाले लोकच करतात सर्वाधिक प्रदूषण
मुंबई : गेल्या काही वर्षांत उन्हाळा प्रचंड वाढला आहे. मार्चमध्ये जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीतच जाणवू लागली आहे.
-२०पेक्षाही कमी तापमान असणाऱ्या देशांमध्येही हिवाळ्यात उष्णतेची लाट आली होती. या दरम्यान ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सर्वाधिक वेळा ऐकला गेला.
हे ग्लोबल वॉर्मिंग ज्या कारणामुळे होते ते कार्बन उत्सर्जन कोण करतं. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, गरीबांपेक्षा श्रीमंत लोक सर्वाधिक कार्बन उत्सर्जन म्हणजेच सर्वाधिक प्रदूषम करतात.
कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, इत्यादी हरितगृह वायुंमुळे जगाचे तापमान वाढत आहे. एखादी संस्था किंवा देश किती प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन करतात याला कार्बन फूटप्रिंट म्हटले जाते.
पॅरिसमधील वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार जगातील श्रीमंत असे १० टक्के लोकच ५० टक्क्यांहून अधिक प्रदूषण करत आहेत. यातही जे सर्वाधिक श्रीमंत आहेत त्यांचे कार्बन फूटप्रिंट सर्वात जास्त आहे. (billionaires lifestyle leads to most of the carbon footprint)
इंडियाना विद्यापीठाच्या आंथ्रोपोलॉजी विभागाने फोर्ब्सच्या २०२०च्या यादीतील २०९५ श्रीमंतांच्या जीवनशैलीचे सर्वेक्षण केले. त्यातून काही गोष्टी समोर आल्या.
रशियन राजकारणी आणि उद्योजक रोमन अब्रामोविच यांचे कार्बन फूटप्रिंट जगात सर्वाधिक आहे. रोमन यांचा तेल आणि वायूचा उद्योग जगभर पसरलेला असून त्यात पर्यावरणविषयक मानकांचे बिनदिक्कत उल्लंघन केले जाते.
ऑक्सफेमच्या अहवालानुसार, १२५ अब्जाधीश दरवर्षी ४०० दशलक्ष मेट्रीक टन कार्बन उत्सर्जित करतात.