‘ब्लॅकबेरी’चा डीटेक50 व डीटेक 60 स्मार्टफोन भारतात सादर

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

डीटेक50 व डीटेक 60 हे स्मार्टफोन अनुक्रमे 21,990 आणि 46,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे. 

कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक 60 हे स्मार्टफोन अनुक्रमे 21,990 आणि 46,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

*भारतीय बाजारात लकरच दाखल होणार:
डीटेक50 येत्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. तर डीटेक 60 हा स्मार्टफोन डिसेंबरपर्यंत बाजारात सादर होणार आहे. कॅनेडियन कंपनी असणार्‍या जुलैमध्ये डीटेक50 सादर केला होता.

दोन्ही स्मार्टफोन एन्ड्रॉईड 6.0.1 मार्शमेलोवर चालतात. ब्लॅकबेरी आता फक्त सॉफ्टवेअरचे डिझाईन करणार असून फोनचे उत्पादन करणार नसल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते. कंपनी आता सॉफ्टवेअर विकसित करण्यावर लक्षकेंद्रित करणार आहे.

'ब्लॅकबेरी'च्या डीटेक50 मध्ये 5.2 इंचाचे फुल-एचडी (1080जे1920 पिक्सल) रिजोल्यूशन आयपीएस एलटीपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 सीपीयू, 2 जीबी / 3 जीबी रॅम देण्यात आलेली आहे. या फोनची अंतर्गत मेमरी 16 जीबी इतकी असून ती 512 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डाचा वापर करून वाढवता येऊ शकते.
ड्युअल कॅमेरा हे या फोनमधील खास वैशिष्ट्य आहे. एफ/2.2 अॅपॅचरसह 13 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला असून, यात लेझर ऑटोफोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसुध्दा देण्यात आला आहे. यात असलेली 2610 एमएएच बॅटरी आठ तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रिमिंग करू शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर 24 तासांपर्यंत संगीत ऐकणे शक्य असल्याचेदेखील म्हटले आहे. फास्ट चार्जिंगची सुविधा असलेली ही बॅटरी दीड तासात फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर केवळ अर्ध्या तासांत ती 45 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

किंमत : डीटेक50 व डीटेक 60 हे स्मार्टफोन अनुक्रमे 21,990 आणि 46,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
 

Web Title: BlackBerry DTEK50, DTEK60 Launched in India