फक्त 1999 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्ट टीव्ही; घरबसल्या मिळेल थिएटरचा आनंद | Realme Smart TV | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Realme NEO Smart TV
फक्त 1999 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टटीव्ही; घरबसल्या मिळेल थिएटरचा आनंद | Realme Smart TV

फक्त 1999 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्ट टीव्ही; घरबसल्या मिळेल थिएटरचा आनंद

Realme Smart TV: फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग्स डे सेल आज संपणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वस्त दरात उत्कृष्ट एलईडी स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. या सेलमध्ये तुम्ही Realme NEO 80 cm (32 इंच) HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही (RMV2101) अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. हा टीव्ही सध्या फ्लिपकार्टवर 12,999 रुपयांच्या किंमतीमध्ये मिळत आहे. हा टीव्ही खरेदी करताना तुम्ही SBI च्या क्रेडिटने पैसे भरल्यास तुम्हाला 1250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. इतकंच नाही तर सेलमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डने पैसे देणाऱ्या यूजर्सना कंपनी 1500 रुपयांची अतिरिक्त ऑफरही देत ​​आहे.

या दोन ऑफर एकत्र केल्यास हा टीव्ही तुम्हाला 10,249 रुपयांना मिळेल. याशिवाय तुम्ही हा टीव्ही एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंतचा अधिक फायदा मिळू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जुन्या टीव्हीच्या बदल्यात पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल, तर रियलमीचा हा टीव्ही कोणत्याही बँकेच्या ऑफरशिवाय केवळ 1,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

वैशिष्ट्ये आणि तपशील-

टीव्हीमध्ये कंपनी 32-इंचाचा HD रेडी बेझल-लेस एलईडी डिस्प्ले देत आहे. टीव्ही TUV राईनलँडच्या ब्लू लाइट प्रमाणपत्रासह येतो. चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी, कंपनी त्यात क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन देखील देत आहे. टीव्हीमध्ये एक विशेष क्विक कास्ट वैशिष्ट्य देखील आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते गेम आणि व्हिडिओ स्मार्टफोनवरून थेट टीव्हीवर प्ले करू शकता.

दमदार साउंडसाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 20 वॅट ड्युअल स्पीकर आहेत. या साऊंड सिस्टीममध्ये घरातील चित्रपटगृहाचा अनुभव देण्याची ताकद आहे. रिअलमीच्या टीव्हीला Mali-470 GPU आणि क्वाड-कोर ARM Cortex-A35 CPU देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये दोन HDMI आणि एक USB पोर्ट आहे.

टॅग्स :saletvLED TVflipkart