प्रकाशाच्या मदतीने कार्बनचे रूपांतर इंधनामध्ये

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

केवळ अतिनील किरणांचा वापर करून हे रूपांतर घडवून आणणाऱ्या उत्प्रेरकाचा (कॅटॅलिस्ट) शोध लागल्याने अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आता सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ही रासायनिक प्रक्रिया तयार करणारे उत्प्रेरक तयार करण्याचे वेध लागले आहेत

बीजिंग - कार्बन डायऑक्‍साइडचे रूपांतर इंधनातील मूलभूत घटक असलेल्या मिथेनमध्ये करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मकणांचा (नॅनो पार्टिकल) शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. यासाठी त्यांनी ऊर्जेचा स्रोत म्हणून अतिनील किरणांचा वापर केला.
केवळ अतिनील किरणांचा वापर करून हे रूपांतर घडवून आणणाऱ्या उत्प्रेरकाचा (कॅटॅलिस्ट) शोध लागल्याने अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आता सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ही रासायनिक प्रक्रिया तयार करणारे उत्प्रेरक तयार करण्याचे वेध लागले आहेत.

हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण वाढत असल्याने ते कमी करणाऱ्या एखाद्या उत्प्रेरकाचा शोध लावण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून सुरू होता. याच प्रयत्नांतून शास्त्रज्ञांना ऱ्होडियम सूक्ष्म कणांचा शोध लागला. हे कण प्रकाश पडताच केवळ प्रकाशमान होत नाहीत, तर त्यापासून मिथेन आणि कार्बन मोनॉक्‍साइड समप्रमाणात तयार न होता, केवळ मिथेन तयार होतो. या प्रक्रियेबाबत अधिक संशोधन सुरू आहे.

Web Title: carbon can used as a fuel