
ChatGPT : ChatGPT च्या मदतीने कंपनीने 90 लाख रुपये वसूल केले, क्लायंट करत होता दुर्लक्ष
ChatGPT : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘चॅटजीपीटी’ हा रोबो (यंत्रमानव) ओपनएआय या अमेरिकी कंपनीने गेल्या नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात आणला आणि पाच दिवसांत त्याचे कोट्यावधी चाहते झाले. चॅटजीपीटी दीर्घ भाषा प्रारूप म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्युलवर (एलएलएम) आधारित काम करतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही नवीन बाब नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे आपण अनेक बाबतीत त्याची अनुभूती घेत आहोतच. इंटरनेट वरून शॉपिंग करणे, गुगल मॅपवरून ईप्सित स्थळी जाणे, ऑटो कार, गेमिंग, घर साफ करणारा रोबोट, हृदयाचे ठोके सांगणारे घड्याळ ही सारे कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे.
मात्र, चॅटजीपीटीने या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. मायक्रोसॉफ्ट-अनुदानीत चॅटबॉटने कंपनीला पैसे देण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाकडून सुमारे 90 लाख रुपये वसूल करण्यात मदत केली.
ग्रेग इसेनबर्ग या व्यक्तीने दावा केलाय की त्याने चॅटजीपीटी प्लॅटफॉर्मचा वापर करून एका ग्राहकाकडून पैसे वसूल केले आहेत. या ग्राहकाने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. इसेनबर्गने ट्विटरवर सांगितले की, त्यांच्या कंपनीने दिग्गज ब्रँडसाठी काही डिझाइनचं काम केलं होतं आणि या ब्रँडलाही डिझाइन आवडलं. पण नंतर त्या कंपनीने बोलणं टाळलं, इसेनबर्गचा आरोप आहे की ब्रँड त्याला टाळू लागला.
twitter वर सांगितली गोष्ट..
इसेनबर्गने ट्विटरवर शेअर करत म्हटलंय की, "एखाद्या अब्जावधी डॉलरच्या क्लायंटची कल्पना करा ज्याने तुम्ही केलेल्या चांगल्या कामासाठी पैसे देण्यास नकार दिला. बहुतेक लोक वकिलांकडे जातील पण मी ChatGPT कडे वळलो. कायदेशीर फीसाठी एक पैसाही खर्च न करता मी $109,500 (सुमारे 90 लाख रुपये) कसे वसूल केले याची गोष्ट इथे आहे.”
महागड्या वकिलाची नेमणूक करण्याऐवजी, इसेनबर्गने चॅटजीपीटीला ईमेलचा मसुदा तयार करायला लावू असा विचार केला. त्याने ChatGPT ला काही इनपुट दिले. जसं की, 'समजा तुम्ही वित्त विभागात काम करता आणि तुमचे ग्राहकांकडून पेमेंट गोळा करणे बाकी आहे. XYZ क्लायंटने तुमच्याकडून घेतलेल्या सेवेसाठी $109,500 डॉलर पैसे देण्यास सांगणारा एक ईमेल केला. परंतु त्याने 5 ही ईमेलला प्रतिसाद दिला नाही. त्याच्या पावत्या पाच महिन्यांपासून थकीत आहेत
दोन मिनिटात मिळालं उत्तर...
इसेनबर्गला ChatGPT कडून मेल आला. हा मेल त्याने थोडा दुरुस्त केला आणि थकबाकी असलेल्या कंपनीला पाठवून दिला. वर मिळालेल्या मसुद्यात काही गोष्टी बदलल्या आणि पाठवल्या. मेल पाठवल्यानंतर, तो थोडासा चिंताग्रस्त झाला होता. परंतु 2 मिनिटांत त्याला कंपनीच्या अधिकाऱ्याकडून उत्तर मिळालं, की आम्ही तुमचे पैसे पाठवून देतो. थोडक्यात या ChatGPT च्या माध्यमातून आता तुमची अडलेली काम सुध्दा पूर्ण होतील.