...म्हणून क्रेडिट अन् डेबिड कार्डवर असतात ठिपके; जाणून घ्या खरं कारण

आता खरेदी आणि व्यवहारांमध्ये नोटांचा वापर कमी होतोय
Credit Card
Credit Cardesakal
Summary

आता खरेदी आणि व्यवहारांमध्ये नोटांचा वापर कमी होतोय

गेल्या काही महिन्यांत जारी करण्यात आलेल्या क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट कार्डमध्ये (Debit cards) काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल म्हणजे कार्डांवर करण्यात आलेले ठिपके. ज्याच्या मदतीने अंध व्यक्तींना (Blind People) आता कार्ड वापरताना मदत होऊ शकते.

Credit Card
क्रेडिट कार्डची रक्कम EMIमध्ये करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी!

आता खरेदी आणि व्यवहारांमध्ये नोटांचा वापर कमी होत असल्याने अधिकाधिक लोक आता पेमेंटसाठी पेटीएम, गुगल पे, यूपीआय आदी सर्व ऑनलाइन आणि अॅप फिचर्सचा आधार घेत आहेत, अशा परिस्थितीत अंध व्यक्तींसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे विशेषत: क्रेडिट आणि डेबिट कार्डची रचना करण्यात आली. ज्यामध्ये पॉईंट्स तयार केले जाताहेत. जेणेकरून अंधांना कार्ड वापरणे सोपे जाईल. युनायटेड किंग्डम (यूके) मधील 20 लाखांहून अधिक लोक दृष्टिहीन समस्येने ग्रस्त आहेत. त्यामुळे असे प्रयोग खूप महत्त्वाचे होते.

कार्डांवरील चिन्हांमुळे पेमेंट करणे सोपे होईल!

पेमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये अंधांच्या मदतीसाठी अनेक नवे बदल केले जात आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक प्रकारचे कार्ड जवळपास सारखेच असायचे. फक्त स्पर्शाने ओळखणे कठीण होते. तेच कार्ड असल्यामुळे दृष्टिहीनांना आपल्याकडील एका पाकिटाची निवड करणे कठीण जात असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे विशिष्ट वर्गासाठी हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरले. आता या नव्या मार्कांच्या माध्यमातून कार्ड रीडरमध्ये ठेवलेल्या कार्डची दिशा त्यांना सहज कळणार असून पैसे भरण्यासाठी किंवा एटीएममधून (ATM)पैसे काढण्यासाठी ते इतर कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.

Credit Card
क्रेडिट कार्डने घरभाडं भरताय...

अंध व्यक्तींसाठी डिझाइन केलेले कार्ड

अंध व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाइंड पीपल (RNIB)संस्थेने प्रोत्साहित केलेल्या बँकांनी अंध व्यक्तींना त्यांच्या कार्डचा योग्य वापर करता यावा, यासाठी या सुविधा सुरू करण्यास सुरुवात केली.

उदा. 2015 मध्ये, नॅटवेस्ट आणि सिस्टर बान आरबीएसने कार्डच्या काठावर नॉच असलेले डेबिट कार्ड लाँच केले. आरएनआयबीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डेव्हिड क्लार्क यांच्या मते, मास्टरकार्डसारख्या काही प्रोव्हायडर्सचे डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे आकार असतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रेल डॉट्स, जे त्यांच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आहे की नाही हे सांगते. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (National Health Service)मते, यूकेमधील सुमारे 20 लाख लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंध आहेत आणि 3,40,000 लोक दृष्टिहीन किंवा अंशतः प्रभावित असल्याचे आढळले, ज्यामुळे बँकांना कार्डांमध्ये हे नवीन बदल करण्यास प्रवृत्त केले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com