Whatsapp बंद पडलं की हॅक झालं? सखोल तपास होणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp new features
Whatsapp बंद पडलं की हॅक झालं? सखोल तपास होणार...

Whatsapp बंद पडलं की हॅक झालं? सखोल तपास होणार...

मेटा कंपनीचा मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेलं व्हॉटसप २५ ऑक्टोबर रोजी भारतासह अनेक देशांमध्ये बराच काळ बंद पडलं होतं. दुपारी १२ वाजल्यापासून जवळपास दोन तास जगाच्या विविध भागांमध्ये व्हॉटसप बंद पडलं होतं. हे कशामुळे झालं? व्हॉटसप हॅक झालं होतं का? याविषयीचा सविस्तर अहवाल आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मागवला आहे.

मंत्रालयाने याप्रकरणी मेटाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. दोन तासांपर्यंत व्हॉटसप का बंद होतं, यामागचं कारण मंत्रालयाने मागितलं आहे. मंत्रालय या प्रकरणाला सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही तपासत आहे. या काळामध्ये कोणता सायबर हल्ला तर झाला नाही ना, ही शक्यता मंत्रालय तपासत आहे. याच प्रकरणी आता मेटाने सविस्तर अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे.

या मोठ्या ब्लॉकनंतर मेटाच्या प्रवक्त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. काही तांत्रिक समस्यांमुळे विविध भागांमध्ये व्हॉटसप बंद पडलं होतं. पण आता ही समस्या दूर झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर सगळंच बंद पडलं होतं. भारतासह इतर देशातल्या अनेक युजर्सला या समस्येचा फटका बसला होता.

टॅग्स :whatsappWhatsapp backup