
Instagram : हे माहिती आहे का? इंस्टाग्रामचे अन् व्हिस्कीचे खूप जुने संबंध आहेत...
Instagram Old Name : एकवेळ इंस्टाग्राम माहीती नसणाऱ्यांचा आकडा काढता येईल पण इंस्टाग्राम वापरणाऱ्यांचा आकडा काढणे जरा कठीण आहे इतकं इंस्टाग्रामच वेड सर्वत्र आहे. तरुण पिढी तर इंस्टाग्रामवर पडीक असते असं म्हणायला काही हरकत नाही.
पण या इंस्टाग्रामच्या नावाची गंमत माहिती आहे का? याची जरा वेगळी आणि मजेशीर गोष्ट आहे. सुरुवातीला अॅप बनवण्याचा हेतू चॅटिंग साठीचे अॅप म्हणून नव्हे तर मोबाईल चेक-इन साठीचे अॅप म्हणून शोध सुरु झाला. केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रिगर हे दोघे इंस्टाग्रामचे फाऊंडरर्स आहेत.
बर्बन् (Burbn) असे होते जूने नाव :
केविन सिस्ट्रॉम केंटकी व्हिस्कीचे चाहते होते म्हणून जेव्हा त्यांनी लोकेशन-आधारित आयफोन अॅप तयार केले त्यांनी याला बर्बन् असे नाव दिले. Burbn वापरकर्त्यांना विशिष्ट ठिकाणी चेक इन करुन देणे, भविष्यातील चेक-इनसाठी योजना बनवून देणे, मित्रांसह हँग आउट करण्यासाठी पॉइंट मिळवून देणे आणि भेटीचे फोटो पोस्ट करणे असे काम करत होते.
इंस्टाग्रामने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रिगर यांनी बनवलेले मोबाइल चेक-इन अॅप बर्न म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. हे फोरस्क्वेअर सारखेच आहे हे लक्षात घेऊन, त्यांनी त्यांचे अॅप फोटो-शेअरिंगवर लक्ष केंद्रित केले, जे त्याच्या वापरकर्त्यांमध्ये एक लोकप्रिय वैशिष्ट्य बनले आहे. त्यांनी "इन्स्टंट कॅमेरा" आणि "टेलीग्राम" चे एक पोर्टमँटो, इंस्टाग्राम असे त्याचे नाव बदलले.