महत्त्वाचे! शहर वा राज्य बदलल्यास नवीन मतदार कार्डची गरज नाही

मतदार ओळखपत्राचा वापर केवळ मत देण्यासाठीच केला जात नाही, तर पत्ता पुरावा म्हणूनही तो एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
 Voter ID Card
Voter ID Card esakal
Summary

मतदार ओळखपत्राचा वापर केवळ मत देण्यासाठीच केला जात नाही, तर पत्ता पुरावा म्हणूनही तो एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. साधारणपणे, मतदान (Voting) करण्यासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID Card) असणे आवश्यक आहे. तुमचे मतदार आयडी कार्ड हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईल (Mobile) किंवा कॉम्प्युटरद्वारे (Computer) ते सहजपणे डाउनलोड (Download) करू शकता. मतदार ओळखपत्राचा वापर केवळ मत देण्यासाठीच केला जात नाही, तर पत्ता पुरावा म्हणूनही तो एक महत्त्वाचा दस्तऐवज (Documents) आहे.

 Voter ID Card
घरबसल्या बनवा तुमचे मतदार ओळखपत्र; जाणून घ्या सोपी पद्धत

11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2021 रोजी देशभरात डिजिटल व्होटर आयडी कार्ड (Digital Voter ID Card) किंवा इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्ड (e-EPIC) सुविधा सुरू केली होती. मतदार ओळखपत्राची नॉन-एडिटेबल आणि सुरक्षित PDF आवृत्ती e-EPIC आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने डाउनलोड करण्यासोबतच तुम्ही डिजी लॉकरमध्ये e-EPIC अपलोड किंवा प्रिंट करू शकता. तुम्ही या सोप्या मार्गांनी e-EPIC डाउनलोड करू शकता.

 Voter ID Card
मतदारांना इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन

कसे डाउनलोड करावे e-EPIC

- सुरवातीला https://www.nvsp.in/ वर जा आणि डाउनलोड e-EPIC कार्ड वर क्लिक करा.

- तुम्हाला नवीन युजर म्हणून लॉगिन/नोंदणी करावी लागेल.

- यानंतर, e-EPIC डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक टाका.

- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP वेरिफाय करा.

- यानंतर, तुम्ही Download e-EPIC वर क्लिक करू शकता.

- जर मोबाईल क्रमांक Eroll मध्ये रजिस्टर्ड नसेल तर…

- केवायसी पूर्ण करण्यासाठी e-KYC वर क्लिक करा.

- यानंतर, तुम्हाला फेस लाइव्हनेस व्हेरिफिकेशन पास करावे लागेल.

- केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.

- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर e-EPIC डाउनलोड करा.

 Voter ID Card
केंद्र सरकारकडून दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र | Global ID card

इतरांसाठीही सुविधा लवकरच उपलब्ध होईल

सध्या NSVP रेकॉर्डमध्ये युनिक मोबाईल नंबर असलेल्या नोंदणीकृत मतदारांसाठी नोव्हेंबर 2020 नंतर ई-EPIC डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे. इतरांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल.

e-EPIC चे फायदे जाणून घ्या

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाने e-EPIC सुविधा सुरू केली होती. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मतदारांना प्रत्येक वेळी शहर किंवा राज्य बदलताना नवीन मतदार ओळखपत्रासाठी विनंती करावी लागणार नाही. ते फक्त त्यांचा पत्ता बदलून कार्डची नवीन आवृत्ती डाउनलोड करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com